शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमभंग झाल्यावर येऊ शकतो हार्ट अटॅक, नव्या रिर्सचमध्ये धक्कादायक खुलासा, महिलांमध्ये प्रमाण जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 17:33 IST

या नवीन संशोधनानुसार, प्रेमभंग झाला, वाईट बातमी ऐकली तर त्या अचानक बसलेल्या धक्क्यामुळे छातीत तीव्र वेदना होऊ शकतात. याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम (Broken Heart Syndrome) म्हणतात.

अनेकदा एखादी वाईट बातमी ऐकली की आपल्याला आपल्या छातीत धडधड वाढल्याची जाणीव होते. अनेकदा जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याची बातमी ऐकून एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊ शकतो. वाईट बातमी ऐकल्यानं एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला, अशा बातम्याही आपण ऐकतो. प्रेमभंग झालेल्या व्यक्तीही ‘दिल के टुकडे हजार हुए’ म्हणत छातीत दुखत असल्याची तक्रार करतात. तेव्हा हृदयाचे आरोग्य का बिघडते असा प्रश्न निर्माण होतो? अचानक झालेले शारीरिक नुकसान किंवा भावनिक ताण यामुळे हृदयविकाराचा झटका आल्यासारखी लक्षणं का दिसतात, हे कसं घडतं, याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये (American Heart Association Journal) याबाबतचा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला आहे.

या नवीन संशोधनानुसार, प्रेमभंग झाला, वाईट बातमी ऐकली तर त्या अचानक बसलेल्या धक्क्यामुळे छातीत तीव्र वेदना होऊ शकतात. याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम (Broken Heart Syndrome) म्हणतात. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे काय?हृदयाला रक्तपुरवठा (Blood Circulation) करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम किंवा चरबी साठल्यामुळे हृदयापर्यंत रक्तपुरवठा नीट होत नाही. अशावेळी हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता अधिक असते. मात्र एखादा अपघात, वाईट बातमी किंवा प्रेमभंग झाल्यामुळे बसलेला धक्का यामुळेही हृदयाच्या नसांवर अचानक ताण येतो आणि त्या कमकुवत होतात. अशावेळी हृदयात वेदना जाणवतात, याला ब्रोकन हार्ट सिंड्रोममध्ये किंवा ताकोत्सुबो सिंड्रोम असेही म्हणतात. जपानमध्ये (Japan) 90च्या दशकात हा आजार ओळखला गेला. जपानमध्ये याला ताकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी असे नाव देण्यात आले. तिथे ऑक्टोपस पकडणाऱ्या सापळ्याला ताकोत्सुबो म्हणतात. या संशोधनानुसार, या सिंड्रोमचे प्रमाण स्त्रियांमध्ये विशेषतः 50 ते 70 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये (Women)अधिक म्हणजे 80 ते 90 टक्के असते. याचा अर्थ असा होत नाही की स्त्रियांचे हृदय कमकुवत असते. या वयातील स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती (Menopause) होत असते. या काळात महिलांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोनची कमतरता निर्माण होते. या कमतरतेमुळे महिलांमध्ये या आजाराचा धोका वाढतो, असे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.

खरं तर, तणाव आणि अडचणी यांना तोंड देण्याबाबत महिला पुरुषांपेक्षा अधिक सक्षम असतात. त्या अशा परिस्थितीतही लवकर सावरतात, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे. त्यामुळं या निष्कर्षाबाबत अधिक सखोल संशोधन होण्याची गरज असल्याचं मत फोर्टिस हॉस्पिटलचे (Fortis Hospital) मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मनु तिवारी यांनी व्यक्त केलं आहे.

फोर्टिस हॉस्पिटलच्या कार्डियाक सायन्स विभागाचे अध्यक्ष डॉ. अजय कौल यांच्या मते, असे रुग्ण बरे होऊ शकतात. त्यांचे हृदय पुन्हा मजबूत होऊ शकते. यासाठी त्यांना कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळींचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञ डॉ.मनू तिवारी यांनीही याला दुजोरा दिला असून, प्रेमभंग झाल्यामुळे हृदयरोगाची शिकार ठरलेल्या व्यक्तीला कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनी फक्त साथ देण्याची गरज आहे. अशा रुग्णांना कोणताही सल्ला न देता त्यांचे म्हणणे ऐकले तरी रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, असं म्हटलं आहे.

प्रेमभंग झाल्यामुळे मानसिकदृष्ट्या दिल के टुकडे हजार हुए म्हणत दुःखी, कष्टी झालेल्या व्यक्तीला प्रत्यक्षात शारीरिकदृष्ट्याही हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो, मात्र त्यातून ते बरे होऊ शकतात. यासाठी त्यांना घरातील लोकांची आणि मित्रपरिवाराची साथ महत्त्वाची आहे, हे या संशोधनातून समोर आलं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटका