शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 08:17 IST

मुंबईतील ‘जीटी’चा समावेश; राज्य सरकारची परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचे प्रमाण वेगाने वाढत असल्यामुळे या आजारावरील उपचाराकरिता आवश्यक असणारी कार्डियाक कॅथलॅब राज्यातील ११ वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयांत सुरू करण्यात येणार आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने सार्वजनिक-खासगी भागीदारी  (पीपीपी) तत्त्वावर या कॅथलॅब सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यात मुंबईतील गोकुळदास तेजपाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.

काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत येणाऱ्या हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या मोठी असते. त्या ठिकाणी दोन कॅथलॅब सुरू करण्यात आल्या आहेत. पीपीपी तत्त्वावर काढण्यात येणाऱ्या कॅथलॅबमध्ये कार्डियाक कॅथलॅब युनिट, ॲनेस्थेशिया वर्क स्टेशन, इको मशीनसह इतर उपकरणांचा समावेश असेल.

या पीपीपी प्रकल्पाचा कालावधी १५ वर्षांचा राहील तसेच शासनाच्या पूर्वमान्यतेने तो कमाल पाच वर्षांपर्यंत वाढविता येईल. सार्वजनिक-खासगी भागीदारीमध्ये खासगी सेवा पुरवठा दाराकडून कॅथलॅब युनिटसाठी आवश्यक असणारी खरेदी, स्थापना तसेच सर्व संबंधित पायाभूत सुविधा उभारणीसाठी भांडवली गुंतवणूक करेल. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा, वीज, पाणी, ऑक्सिजन पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा संबंधित संस्था उपलब्ध करून देईल.

राज्यातील ‘ती’ महाविद्यालये कोणती?

  • गोकुळदास तेजपाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मुंबई)
  • स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (अंबाजोगाई)
  • श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (धुळे)
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर)
  • डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नांदेड)
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (गोंदिया) 
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मिरज)
  • आरोग्य पथक (पालघर)
  • छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सातारा)
  • श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (यवतमाळ)
  • बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (पुणे)
English
हिंदी सारांश
Web Title : Cardiac Cath Labs in 11 Medical Colleges: Heart Treatment Easier

Web Summary : Eleven Maharashtra medical colleges will get cardiac cath labs via PPP, improving heart treatment access. Facilities include advanced equipment. The project spans 15 years, extendable by five, with private investment and institutional support.
टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स