शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये काय आहे फरक? दोनपैकी काय जास्त खतरनाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 10:02 IST

Cardiac arrest vs Heart attack differences : अनेक लोक आजही कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकवरून कन्फ्यूज होतात. पण या दोन्ही समस्यांमध्ये बराच फरक आहे. आज तोच फरक आम्ही सांगणार आहोत.

Cardiac arrest vs Heart attack differences : बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं 66 वयात कार्डियक अरेस्टने निधन झालं. गेल्या काही वर्षात हृदयासंबंधी आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. आधी खूप जास्त वयात हृदयरोगांच्या केसेस समोर येत होत्या. तेच आजकाल कमी वयातच हे आजार होतात. तरूणांनाही कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. अनेक लोक आजही कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकवरून कन्फ्यूज होतात. पण या दोन्ही समस्यांमध्ये बराच फरक आहे. आज तोच फरक आम्ही सांगणार आहोत.

कार्डियक अरेस्ट काय आहे?

जेव्हा मनुष्याच्या हृदयाची धडधड बंद होते आणि शरीरातील इतर अवयवांमध्ये रक्त पुरवठा होत नाही त्या स्थितीला कार्डियक अरेस्ट म्हटलं जातं.

नेमकं काय होतं?

जेव्हा एखाद्या व्यक्तीला कार्डियक अरेस्ट येतो तेव्हा ती व्यक्ती काही मिनिटांसाठी बेशुद्ध होते. चिंतेची बाब ही आहे की, जर यात वेळीच उपचार केले नाही तर व्यक्तीचा जीवही जातो.

कार्डियक अरेस्टची कारणं

कार्डियक अरेस्टबाबत सगळ्यात जास्त चिंतेची बाब म्हणजे हा कुणालाही येऊ शकतो. अनेकदा हार्ट अटॅकही याचं कारण ठरू शकतो. त्याशिवाय जर एखाद्या व्यक्तीच्या हृदयाच्या मांसपेशी कमजोर असेल तर या कारणानेही कार्डियक अरेस्ट येऊ शकतो.

काय आहे हार्ट अटॅक?

हार्ट अटॅक कार्डियक अरेस्टपेक्षा वेगळा असतो आणि कार्डियक अरेस्टपेक्षा कमी घातक असतो. जेव्हा हृदयापर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या धमण्यांमध्ये अडथळा निर्माण होतो किंवा धमण्या 100 टक्के ब्लॉक होतात, त्या स्थितीत व्यक्तीला हार्ट अटॅक येतो.

हार्ट अटॅकमध्ये काय होतं?

हार्ट अटॅक येण्याआधी व्यक्तीमध्ये वेगवेगळी लक्षण दिसू लागतात. यात छातीत वेदना होणे किंवा छातीत जडपणा वाटणे अशी सामान्य लक्षण आहेत. त्याशिवाय श्वास भरून येणे, घाम येणे किंवा उलटी होणे हेही लक्षण आहेत. ही लक्षण लगेच किंवा काही तासांनी समोर येतात.

हार्ट अटॅकची कारणं

हार्ट अटॅक येण्याचं कारण तुमची खराब लाइफस्टाईल असू शकते. जर तुमची लाइफस्टाईल चांगली नसेल तर तुम्ही स्वत: तुम्हाला या स्थितीत नेऊ शकता. आजकाल लोकांच्या चुकीच्या खाण्या-पिण्या किंवा पुरेशी झोप न घेणे किंवा एक्सरसाइज न करे ही हार्ट अटॅकची सामान्य कारणे असू शकतात.

दोन्हींपासून बचावाचे उपाय

कार्डियक अरेस्टपासून बचावासाठी काही उपाय करू शकता. एक्सपर्ट्स सांगतात की, हार्टची योग्य ती काळजी घेतली तर हार्टसंबंधी आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही तुमची लाइफस्टाईल हेल्दी ठेवा, योग्य आहार घ्या, रोज एक्सरसाइज करा, वजन कमी ठेवा, तणाव कमी करा, स्मोकिंग-अल्कोहोलचं सेवन करू नये, वेळेवेळी डॉक्टरांना संपर्क करत रहा.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स