शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

Corona Treatment: कोरोना उपचारात भांग फायदेशीर ठरणार? संशोधनातून दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 18:43 IST

भांग (cannabis) कोरोनावर (COVID-19 ) परिणामकारक असल्याचे संशोधनात पुढे आले आहे. भांगेत सापडलेला एक गुण संशोधकांना कोरोना विरोधात लढण्याची (fight against the corona) आशा दाखवत आहे.

कोरोना (Corona) महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. एक लाट संपते तोच दुसरी, दुसरी संपते तोच तिसरी, असे सुरुच आहे. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये संशोधन (Research) सुरू आहे. त्यातच भांग (cannabis) कोरोनावर (COVID-19 ) परिणामकारक असल्याचे संशोधनात पुढे आले आहे. भांगेत सापडलेला एक गुण संशोधकांना कोरोना विरोधात लढण्याची (fight against the corona) आशा दाखवत आहे.

कोरोनाचा नायनाट करण्यासाठी अनेक प्रकारचे संशोधन केले जात आहे. अमेरिकेमधील संशोधनात असे समोर आले आहे की, भांगेमध्ये आढळणारा सक्रिय घटक कॅनॅबिडिओल ( cannabidiol - CBD) हा कोरोनाला कारणीभूत असलेल्या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. संशोधकांच्या मते, सीबीडीने प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये आशादायक परिणाम दाखवले आहेत. परंतु कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी आणखी काही चाचण्या कराव्या लागतील.

कोरोनाचा संसर्ग टाळता येईल?शिकागो विद्यापीठाच्या मार्शा रोसनर यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले. ते म्हणतात की, 'प्रयोगशाळेच्या चाचणीचा निष्कर्ष ट्रायल सुरू करण्यासाठी एक मजबूत आधार देतो.' वृत्तसंस्था रॉयटर्सला त्यांनी सांगितले की, 'आम्ही संशोधन केल्यानंतर आलेला निष्कर्ष असं सांगत नाहीत की सीबीडी रुग्णांसाठी उपयोगी ठरेल. तर, आमचा निष्कर्ष हा क्लिनिकल चाचणीसाठी (Clinical Trial) एक मजबूत पार्श्वभूमी बनवतो आहे.' अद्याप त्याची मानवांवर चाचणी झालेली नसल्यामुळे, भांग खाल्ल्याने कोरोनाचा संसर्ग टाळता येईल, असे मानू नये.

प्रमुख संशोधक रोसनर पुढे म्हणाले, 'आमचा निष्कर्ष असा सांगतो की, सीबीडी आणि त्याचे मेटाबोलाइट 7-OH-CBD देखील संसर्गाच्या सुरुवातीच्या आणि नंतरच्या अवस्थेत SARS-CoV-2 संसर्गाला प्रतिबंध करू शकतात'. या पेशी-आधारित निष्कर्षांव्यतिरिक्त, प्री-क्लिनिकल अभ्यासात असे दिसून आले आहे की, सीबीडी उपचाराने SARS-CoV-2-संक्रमित उंदरांच्या फुफ्फुसातील व्हायरल टायटर आणि नाकातील टर्बिनेट्स कमी केले.

क्लिनिकल ट्रायलची आवश्यकतासायन्स अ‍ॅडव्हान्सेसच्या रिपोर्टनुसार, संशोधकांना असे आढळून आले की, 'व्हायरस असलेल्या पेशींमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच सीबीडी कार्य करते. यामुळे इन्फ्लेमेटरी प्रोटिन इंटरफेरॉनवर (Inflammatory Protein Interferon) होणार्‍या प्रभावामुळे व्हायरसला स्वतःची कॉपी बनवण्यापासून रोखले जाते. संशोधकांना हाच परिणाम संक्रमित उंदरांवर जाणवला. रोसनर म्हणाले, 'सीबीडी कोविडला प्रतिबंध करू शकते की नाही, हे आम्हाला अद्याप माहीत नाही, परंतु आम्हाला वाटते की आमचे परिणाम क्लिनिकल चाचण्या करण्यासाठी मजबूत आधार देतात. आम्हाला क्लिनिकल ट्रायल हवी आहे.'

विऑन वेबसाईटवर देण्यात आलेल्या वृत्तानुसार, संशोधकांनी सांगितले की प्रयोगशाळेतील चाचणीचे परिणाम सकारात्मक आहेत. परंतु अद्याप मानवांवर चाचणी करणे बाकी आहे. त्यानंतरच अजून काही गोष्टी स्पष्ट होतील. कोविडचे असे अनेक उपचार आहेत, ज्यांनी टेस्ट ट्यूबमध्ये चांगले परिणाम दिले, परंतु पुढे ते अपेक्षित काम करू शकले नाहीत. त्यामुळे मानवांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांशी संबंधित चाचण्यांनंतरच कोणताही निष्कर्ष काढता येईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. या महामारीचा नायनाट होण्यासाठी सातत्याने नवनवीन संशोधन करण्यात येत आहे. भांगेमुळे कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होऊ शकते, अशी आशा संशोधकांना आहे. या संशोधनातून नेमका काय निष्कर्ष निघतो, हे लवकरच कळेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स