शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कॅन्सरपश्चात ‘प्रेमा’अभावी वाढतो नैराश्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 17:31 IST

कॅन्सर सर्जरी केल्यावर रुग्णांना प्रेम आणि भावनिक आधार न मिळल्याने नैराश्य येणाची शक्यता तिपटीने वाढते.

कॅन्सरसारखी दुर्धर व्याधी म्हणजे व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारी असते. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही तऱ्हेने माणसाला हतबल करणाऱ्या कॅन्सरचे अनेक दुष्परिणाम असतात. कॅन्सरवर इलाज केल्यावर रुग्णांना आप्तेष्टांच्या प्रेमाची, जिव्हाळ्याची गरज असते. नाही तर अशा रुग्णांना नैराश्याचा धोका मोठ्या प्रमाणात संभावतो, असे एका संशोधनातून दिसून आले आहे.साऊथम्प्टन विद्यापीठ आणि मॅकमिनल कॅन्सर सपोर्ट यांनी मिळून केलेल्या एका अध्ययनानुसार, कॅन्सर सर्जरी केल्यावर रुग्णांना प्रेम आणि भावनिक आधार न मिळल्याने नैराश्य येणाची शक्यता तिपटीने वाढते.प्रस्तुत अध्ययनामध्ये संशोधकांनी एक हजारांपेक्षा जास्त कोलोरेक्टल कॅन्सर असणाऱ्या रुग्णांचा सर्जरीपूर्वीपासून ते नंतर पाच वर्षांपर्यंत सखोल अभ्यास केला. त्याला त्यांनी ‘कोलोरेक्टल वेलबीर्इंग’ असे नाव दिले. यामध्ये असे दिसून आले की, अशा प्रकारचा कॅन्सर असणाऱ्या रुग्णांशी सर्जरीनंतर लोकांचा भावनिक संपर्क कमी होतो. त्यांना लोक योग्य तशी वागणूक देत नाही.प्रा. क्लेअर फोस्टर सांगतात की, ‘कॅन्सरच्या रुग्णांना आपल्या जवळच्या लोकांच्या आधाराची खूप गरज असते. कर्करोगाचे निदान आणि त्यानंतरच्या उपचार कालावधीमध्ये त्यांना मानसिक सहकार्य हवे असते. सर्जरीनंतर पूर्ववत स्थितीमध्ये परतण्यासाठी आप्तेष्टांचे भावनिक सहकार्य मिळायलाच हवे. नाही तर, रुग्णांना नैराश्य येण्याचा धोका खूप वाढतो.ज्या रुग्णांना मनमोकळेपणाने बोलायला किंवा दैनदिन कामांत मदत करण्यासाठी कोणी आसपास नसल्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्यात अनेक अडचणी येतात. विशेष म्हणजे, एकटे राहणाऱ्या कॅन्सर रुग्णांसाठी तर नैराश्य आणि उदासिनतेचा धोका अधिकच प्रबळ असतो. त्यामुळे संशोधक  अशा रुग्णांना इमोशनल सपोर्ट देण्याचा आवर्जुन सल्ला देतात.