शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

कर्करुग्णांचे लसीकरण आवश्यक, घाबरण्याची गरज नाही - डॉ. पाठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 07:23 IST

पॉझिटिव्ह आल्यास शस्त्रक्रिया, रेडिएशन व केमोथेरपी पुढे ढकलावी

मेहा शर्मा -नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक अक्षरशः दहशतीत आले असून, कर्करुग्णांच्या मनात तर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोरोना व कर्करोग यासंदर्भात ‘लोकमत’ने नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक यांच्याशी संवाद साधला.

कर्करुग्णांना कोरोना संसर्गाचा किती धोका असतो?कमी प्रतिकारशक्ती असल्यामुळे कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांना गंभीर कोरोना होऊ शकतो. संसर्गाच्या दरानुसार या लोकांना बाधा होण्याची जास्त शक्यता असते.या काळात कर्करुग्णांसाठी सर्वाधिक चिंतेची बाब कोणती?उपचारादरम्यान रुग्ण पॉझिटिव्ह येणे हे त्याच्यासाठी व त्याच्यावर उपचार करणाऱ्या आँकोलॉजिस्टसाठी मोठे आव्हान असते. कोरोनामुळे उपचारावर मर्यादा येतात. शिवाय नियोजित शस्त्रक्रिया व रेडिएशन थेरपी पुढे ढकलावी लागते. कोरोनासाठी आयसोलेशन आवश्यक आहे आणि कोरोनाशी संबंधित गंभीरता निर्माण झाली तर उपचारांची दिशा बदलावी लागते.कर्करुग्णांची रोगप्रतिकारक्षमता वाढावी, यासाठी काही औषधे आहेत का?योग्य पद्धतीने फीट होणारे मास्क, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग हीच मुख्य खबरदारी आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये रुग्णांवरील उपचाराचे क्षेत्र व प्रतीक्षा केंद्र हेदेखील वेगळे ठेवले आहे. त्यामुळे कर्करुग्ण रुग्णालयातील विषाणूशी संपर्कात येत नाहीत.जर कर्करुग्ण पॉझिटिव्ह आले तर त्यांच्या आजारात आणखी भर पडेल की ते इतर रुग्णांसारखे बरे होतील?अनेक कर्करुग्ण कोरोनाने बाधित झाले होते. मात्र, त्यातून ते पूर्णतः बाहेर निघाले आहेत. मात्र, त्यांना मधुमेह, रक्तदाब असेल किंवा कर्करोग फुप्फुसांपर्यंत पसरला असेल तर मात्र जटिलता वाढू शकते.कोरोना व थेरपीमुळे भूक कमी होते. मग ठीक होण्यासाठी आहार कसा असावा?ही अतिशय कठीण स्थिती आहे. लवकरात लवकर ठीक होण्यासाठी आहारतज्ज्ञांकडून विशेष आहार देण्यात येतो किंवा आम्ही त्यांना आयव्ही न्यूट्रिशन्सच्या सप्लिमेंटवर ठेवतो.रुग्णालयात भरती झाल्यानंतर रुग्णांनी कोणत्या तज्ज्ञांना संपर्क करावा?कर्करुग्ण कोरोनामुळे भरती झाल्यास त्याने कोविडतज्ज्ञ तसेच आँकोलॉजिस्ट अशा दोघांनाही संपर्क करायला हवा. आँकोलॉजिस्टला उपचारांची पूर्ण माहिती असली पाहिजे. कोरोनाच्या औषधांची कर्करोगाच्या औषधासोबतच सरमिसळ व्हायला नको.ब्लड थिनर्स थांबवावे का ?ब्लड थिनर्सचा वापर करायलाच हवा, अन्यथा त्यामुळे थ्रॉम्बॉसिस होऊ शकतो. मात्र, काही रुग्णांमध्ये त्यांचा एकूण इतिहास पाहता आँकोलॉजिस्टचा सल्ला घेऊन त्यांना थांबवता येऊ शकते.कर्करुग्णांचे लसीकरण व्हावे का?कर्करुग्णांचेदेखील लसीकरण झाले पाहिजे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही अनेक कर्करुग्णांचे लसीकरण केले आहे. मात्र, लिम्फोसाइट असलेल्या रुग्णांसाठी ते किती फायदेशीर ठरेल, हे सांगता येत नाही.कर्करुग्णांसाठी लसीकरणाची मार्गदर्शक तत्त्वे सारखीच आहेत का?ते वेगळ्या गटातील लोक आहेत. त्यामुळे त्यांचा आजार व थेरपी यांचा विचार व्हायला हवा. कर्करुग्णांचे लसीकरण करण्याचा सल्ला देण्यात येतो. कारण त्यामुळे त्यांना विषाणूच्या घातक प्रभावापासून वाचता येऊ शकते.कर्करुग्णांनी कोरोनाची नियमित चाचणी करावी का?अजिबात नाही. जर त्यांची शस्त्रक्रिया होणार असेल तरच त्यांनी चाचणी करावी, अन्यथा लक्षणांप्रमाणे त्यांनी चाचणी करावी. नियमित चाचणीची काहीच आवश्यकता नाही.

पॉझिटिव्ह आल्यानंतर कर्करुग्णांनी उपचार-थेरपी सुरू ठेवावी का ?जर शस्त्रक्रिया असेल तर ते निगेटिव्ह येईपर्यंत ती पुढे ढकलायला हवी. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका असतो. शिवाय शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरीला वेळ लागू शकतो. सोबतच श्वसनाशी संबंधित समस्या निर्माण होऊन मृत्यू होण्याचीदेखील भीती असते. नियोजित रेडिएशन व केमोथेरपीदेखील थांबवणे योग्य ठरते; परंतु जर आयुष्य वाचविण्यासाठी पावले उचलायची असतील तर इतर काळजी घेऊन शस्त्रक्रिया होऊ शकते. लवकरात लवकर रेडिएशनदेखील सुरू होऊ शकते. कारण तो शरीराच्या एकाच भागावर प्रभाव करतो. मात्र, केमोथेरपी ही शरीर सर्व बाबींसाठी सज्ज झाल्यावरच करावी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdoctorडॉक्टर