शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

हिरवा कफ झाल्यावर अ‍ॅंटी-बायोटिक्स घ्यावे की नाही? डॉ. नेने यांनी दिला खास सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 11:23 IST

Green Mucus : डॉक्टर श्रीराम नेने यांनी याबाबत एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी हिरवा कफ असल्यावर अ‍ॅंटी-बायोटिक घ्यावं की नाही? याबाबत माहिती दिली आहे. 

Green Mucus : वातावरण बदल झाला की, लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. सर्दी-खोकला होणं तर कॉमनच आहे. पण एक समस्या सगळ्यात जास्त त्रास देते ती म्हणजे कफ. याने छातीत समस्या होते. हिरवा कफ आल्यावर तर लोक आणखीनच घाबरतात. अशात अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी याबाबत एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी हिरवा कफ असल्यावर अ‍ॅंटी-बायोटिक घ्यावं की नाही? याबाबत माहिती दिली आहे. 

का होतो हिरवा कफ?

आपल्या श्वसननलिकेत जेव्हा एखादं इन्फेक्शन किंवा सूज होते, तेव्हा कफ तयार होतो. सामान्यपणे कफाचा रंग पांढरा किंवा हलका पिवळा असतो. पण जेव्हा इन्फेक्शन जास्त होतं तेव्हा कफ हिरवा आणि घट्ट होतो. हिरवा कफ याचा संकेत देतो की, शरीर इन्फेक्शनसोबत लढण्यासाठी पांढऱ्या रक्तपेशी तयार करत आहे.

हिरवा कफ असल्यावर अ‍ॅंटी-बायोटिक्स गरजेचे?

डॉ. नेने यांनी याबाबत सांगितलं की, हिरव्या कफाचा अर्थ नेहमीच बॅक्टेरिअल इन्फेक्शन होत नाही. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की, हिरवा कफ झाल्यावर त्यांना अ‍ॅंटी-बायोटिक्सची गरज आहे. पण हा मोठा गैरसमज आहे.

डॉ. नेने यांनी सांगितलं की, जास्तीत जास्त केसेसमध्ये हिरवा कफ वायरसमुळे होतो. जसे की, सर्दी किंवा फ्लू आणि वायरसवर अ‍ॅंटी-बायोटिक्सचा काहीच प्रभाव होत नाही. अशात केवळ कफाच्या रंगावरून अ‍ॅंटी-बायोटिक्स घेण्याचा निर्णय घेणं योग्य नाही.

कफ दूर करण्याचे उपाय

- दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.

- आराम करा आणि शरीराला इन्फेक्शनसोबत लढण्यासाठी वेळ द्या.

- हलक्या गरम गोष्टी म्हणजे सूप, आल्याचा चहा, तुळशीचा चहा याने कफ पातळ होतो. 

- रोज सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य