शहरं
Join us  
Trending Stories
1
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
2
७ वर्षाचे नाते, मग लग्न, सरकारी नोकरी लागताच पत्नीचे मन बदलले; इंजिनिअरला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल
3
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावाचे स्टँड काढून टाकण्याचे आदेश
4
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
5
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
6
एक रुपयाच्या दुर्मीळ नोटीच्या व्यवहारात १० लाखांचा गंडा, मुंबईतील कॅशियरला ठकवले
7
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
8
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
9
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
10
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
11
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
12
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
13
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
14
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
15
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
16
प्रेमाने ‘किसन’ अशी हाक मारणारे कमी झाले, पण दाराबाहेर चपला हीच श्रीमंती!
17
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
18
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
19
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
20
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता

पांढरे, काळे की लाल कोणते तांदूळ जास्त फायदेशीर ठरतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 13:25 IST

पांढरे तांदूळ एक सिंपल कार्बोहायड्रेट असतं ज्याचा अर्थ आहे की, तुमचं शरीर त्याला सहजपणे तोडू शकतं. तसेच पोषक तत्व आणि कार्बोहायड्रेटला अधिक वेगाने अवशोषित करू शकतात.

सामान्यपणे भारतीय घरांमध्ये पांढऱ्या तांदळाचा भात खाल्ला जातो. हे तांदूळ सहज शिजणारे आणि पचन होणारे असतात. पण तुम्हाला माहीत नसेल की, पांढऱ्या तांदळाऐवजी काळे, ब्राउन आणि रेड तांदुळही असतात ज्यांचे अनेक फायदे आहेत. पांढरे तांदूळ एक सिंपल कार्बोहायड्रेट असतात ज्याचा अर्थ आहे की, तुमचं शरीर त्याला सहजपणे तोडू शकतं. तसेच पोषक तत्व आणि कार्बोहायड्रेटला अधिक वेगाने अवशोषित करू शकतात. पण ब्राउन, ब्लॅक आणि रेड तांदळांना पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत जास्त हेल्दी मानलं जातं.

पांढऱ्या तांदळाचे फायदे

पांढऱ्या तांदळातून आपल्याला ऊर्जा मिळते. आपलं शरीर याला सहजपणे तोडू शकतं. तसेच यातील पोषक तत्व आणि कार्बोहायड्रेट वेगाने अवशोषित होतात. कारण यात चोकर कमी असतं. सोबतच यात फायबर आणि फॅटचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे पांढरे तांदूळ लोकांसाठी एक चांगला पर्याय आहेत. 

ब्राउन राइस

ब्राउन राइस एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जे फायबर, प्रोटीन आणि फॅटने भरलेले असतात. हे पचनणं काही लोकांसाठी फार अवघड असू शकतात. पांढऱ्या तांदळांमुळे शरीरातील जळजळ कमी करता येते, पण ब्राउन राइस हे काम थोडं उशीरा करतं. जर तुम्हाला गंभीर बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर पांढरे तांदूळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. 

रेड राइस

पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत रेड राइस तेवढं कॉमन नाहीये. हा राइस महाग असतो. तसेच दुकानांमध्ये फार कमी उपलब्ध असतो. पांढरे तांदूळ तुमच्या आरोग्यासाठी पूर्णपणे खराब ठरू शकत नाही. जर तुम्ही हे कमी प्रमाणात खाल्ले तरच. पण रेड राइस तुम्हाला सगळ्या स्थितीत फायदे देतो. पोष्टिक जेवण बनवण्यासाठी तुम्ही यात इतर पौष्टिक गोष्टींचं मिश्रण करू शकता. रेड राइजमध्ये अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट असतात जसे की, सेलेनियम, व्हिटॅमिन सी आणि बिटा कॅरोटीन.

ब्लॅक राइस

ब्लॅक राइस फार हेल्दी मानले जातात. यातील एंथोसायनिन डोळ्यांसाठी फायदेशीर असतं. नियमितपणे यांचं सेवन केलं तर मोतिबिंदू आणि डायबिटीक रेटिनोपॅथीसारखा धोका कमी करण्यास मदत मिळतो. ब्लॅक राइसमधील अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व हृदय हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. तसेच याने डायबिटीसचा धोकाही कमी होतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य