शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'या' समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नये वांग्याची भाजी, होऊ शकतात गंभीर समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 11:19 IST

Who Should not eat Brinjal: बऱ्याच लोकांना वांगी आणि बटाटे सोबत खाणं आवडतं. वांग्याची भाजी लोक बाराही महिने खातात. वांगी खाण्याचे आरोग्याला जसे अनेक फायदे आहेत तसे काही नुकसानही आहेत. 

Who Should not eat Brinjal:  वांग्याची भाजी अनेकांना आवडते. लोक वेगवेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी खातात. कुणी वांग्याचं भरीत खातात, कुणी मसाल्याची वांगी तर कुणी आणखी वेगळ्या पद्धतीने. बऱ्याच लोकांना वांगी आणि बटाटे सोबत खाणं आवडतं. वांग्याची भाजी लोक बाराही महिने खातात. वांगी खाण्याचे आरोग्याला जसे अनेक फायदे आहेत तसे काही नुकसानही आहेत. 

हिवाळ्यात वांगी खाणं फार हेल्दी मानलं जातं. वांग्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल राहतं आणि हृदयरोगांमध्येही याचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. मात्र, वांगी सगळे लोक खाऊ शकत नाहीत. काही लोकांसाठी वांगी खाणं नुकसानकारक ठरू शकतं. तेच आज आम्ही सांगणार आहोत की, कुणासाठी वांग्याची भाजी खाणं नुकसानकारक ठरू शकतं.

कुणी खाऊ नये वांग्याची भाजी?

गॅसची समस्या

वांग्यामुळे गॅस तयार होतो. ज्यामुळे पोटासंबंधी आणि गॅससंबंधी समस्या होते. ज्यांना नेहमीच पोटासंबंधी किंवा गॅससंबंधी समस्या राहतात त्यांनी वांग्याची भाजी खाणं टाळलं पाहिजे. 

स्कीन एलर्जी

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेसंबंधी एलर्जी असेल, तर वांग्याची भाजी खाणं टाळलं पाहिजे. कारण वांग्यामुळे स्कीन एलर्जी आणखी वाढू शकते.

तणाव किंवा डिप्रेशन 

वांगी अशा लोकांनीही खाऊ नये ज्यांना कोणत्याही प्रकारचं डिप्रेशन असेल. कारण डिप्रेशनमध्ये जास्तीत जास्त लोक औषधं घेत असतात आणि वांग्यामुळे औषधांचा प्रभाव कमी होतो.

रक्त कमी असेल तर...

जर तुमच्या शरीरात रक्त कमी असेल तर तुम्ही वांग्याचं सेवन टाळलं पाहिजे. कारण वांग्यांमुळे रक्त तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. 

डोळ्यांसंबंधी समस्या

तुमच्या डोळ्यांमध्ये सतत जळजळ होत असेल, रूतल्यासारखं वाटत असेल, एलर्जी किंवा सूज असेल तर वांगी खाणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. या समस्या असताना वांगी खाणं टाळलं पाहिजे.

पाईल्स

अनेकांना आजकाल वेगवेगळ्या कारणांनी पाईल्सची समस्या होत असते. ही समस्या असल्यावर वांगी खाणं सगळ्यात घातक ठरू शकतं. कारण वांगी खाल्ल्याने ही समस्या अधिक वाढते.

किडनी स्टोन

वांग्यांमध्ये ऑक्सालेट नावाचं तत्व असतं. जे किडनीमधील स्टोन वाढण्याचं काम करतं. अशात वांगी चुकूनही खाऊ नये. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य