संक्षिप्त बातम्यांचा प˜ा २

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:30+5:302014-12-18T00:40:30+5:30

स्पर्धा परीक्षांची भीती बाळगू नये : भोगे

Brief news letter 2 | संक्षिप्त बातम्यांचा प˜ा २

संक्षिप्त बातम्यांचा प˜ा २

पर्धा परीक्षांची भीती बाळगू नये : भोगे
नाशिक : विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची भीती बाळगू नये, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी मुकेश भोगे यांनी केले. पुणे विद्यापीठ व मविप्र संस्थेच्या कर्मवीर शांतारामबापू वावरे महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
---
सुरक्षारक्षकांचे कामगार उपआयुक्तांना निवेदन
नाशिक : जिल्‘ातील महापारेषण कंपनीत काम करत असलेल्या सुरक्षारक्षकांना वाढीव वेतन व फरक मिळावा, या मागणीचे निवेदन कामगार आयुक्तांना देण्यात आले. यावेळी संजय काळे, नामदेव तुंगार, निवृत्ती देवरे आदि उपस्थित होते.
---
पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार
नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियानांतर्गत अहल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा जाहीर केली आहे. स्पर्धेत पाणी वापर संस्थांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
समाजपरिवर्तन केंद्रातर्फे जलजागृती अभियान
नाशिक : आमदार बापूसाहेब उपाध्ये यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजपरिवर्तन केंद्राने जिल्‘ामध्ये जलजागृती अभियान निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. पाणी सुरक्षित कसे ठेवायचे, काटकसरीने कसे वापरायचे याबाबतची जनजागृती यावेळी करण्यात येईल.
---
सप्तपदीचा ब्राšाण वधू-वर मेळावा
नाशिक : सप्तपदी डॉ. कॉम विवाहसूचक संस्थेमार्फत चित्तपावन मंगल कार्यालयात ब्राšाण वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वधू-वरांच्या दिलखुलास मुलाखतीतून एकमेकांचा परिचय घेण्यात आल्या.
---
अद्वैत कॉलनीत बेकायदेशीर वूड फॅक्टरी
नाशिक : ज्युन्या फर्निचरचे नवीन करून विकण्याचा गोरखधंदा अद्वैत कॉलनी येथे सुरू आहे. लाकडावर प्रक्रिया करताना फ्रेंच पॉलिश व इतर विषारी रसायनांचा वापर केला जात असल्याने त्याचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
---
जेसीआय अध्यक्षांचा पदग्रहण समारंभ
नाशिक : सामाजिक, सांस्कृतिक तसेच तरुणांकरिता काम करणारी जेसीआय संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा नाशिक्लब येथे नुकताच पार पडला. यावेळी अध्यक्ष कल्पेश लाहोरी यांनी यावेळी कार्यभार स्वीकारला.
---

Web Title: Brief news letter 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.