शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Breast cancer : ब्रेस्ट कॅन्सरपासून बचावासाठी काय खायचं आणि काय खाऊ नये? वाचा आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 13:09 IST

Breast cancer : महिलांच्या ब्रेस्टमध्ये जखम झाल्यास दुग्ध नलिकांवर परिणाम होतो त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.

ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये सर्वाधिक उद्भवणारा आजार आहे. जगभरात बेस्ट कॅन्सरमुळे लाखो महिलांचा अकाली मृत्यू होतो. ब्रेस्ट कॅन्सरसाठी महिलांवर करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार २०२० मध्ये या आजारामुळे जवळपास ७ लाख १२ हजार  ७५८ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. २०२५ पर्यंत हा आकडा ८ लाखांपर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. 

आयुर्वेदानुसार स्तनांच्या कॅन्सरचे सगळयात मोठं कारण हे आपली दिनचर्या हे आहे. जीवशैलीतील बदलांमुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मांस, अंड,  दारू, नशायुक्त पदार्थ यांमुळे  महिलांमध्ये ब्रेस्ट कँन्सरचा धोका वाढतो. आयुर्वेदानुसार जर झोपण्याची स्थिती योग्य नसेल तर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. महिलांच्या ब्रेस्टमध्ये जखम झाल्यास दुग्ध नलिकांवर परिणाम होतो त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.

आयुर्वेदाच्या प्रभावी उपचारातून एखाद्याला ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून आराम मिळू शकतो. आयुर्वेद ही एक प्राचीन आयुर्वेदिक औषध प्रणाली आहे जी गंभीर आजारांच्या उपचारासाठी प्रसिद्ध आहे आणि या औषधाच्या यंत्रणेचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. याबाबत अधिक माहिती ओन्ली माय हेल्थशी बोलताना आयुर्वेद विशेषज्ञ डॉ चंचल शर्मा यांनी दिली आहे. 

लक्षणं

- स्तनांमध्ये गाठ

- स्तनांचा बदललेला आकार

- एक भाग कठीण जाणवणे

- त्वचेच्या पोतामध्ये बदल (संत्र्याची सालीसारखा दिसणे)

- लालसर पणा, पुरळ येणे

- स्तनांग्रंथामधून कोणताही दाब न देता द्रव बाहेर पडणे (Nipple Discharge)

- काखेजवळ सूज, वेदना होणे

प्रत्येक स्त्रीने योग्य सर्जनकडून तपासणी करणे गरजेचे आहे.

आयुर्वेदातील ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार

ब्रेस्ट कॅन्सरच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आयुर्वेदिक उपचार फायदेशीर ठरतात. आयुर्वेदाच्या हर्बल औषधांचे नियमित सेवन केल्यास ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी आयुर्वेदची पंचकर्म थेरपी देखील एक प्रभावी पर्याय आहे. आयुर्वेदात आहारावर अधिक जोर देण्यात आला आहे आणि जर सुरुवातीच्या लक्षणे माहित असतील तर विशेष आहार आणि आयुर्वेदिक औषधांद्वारे ब्रेस्ट कॅन्सर दूर केला जाऊ शकतो. आयुर्वेद ब्रेस्ट कॅन्सरनं ग्रस्त असलेल्या महिलांना अधिक व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न खाण्याचा सल्ला देतो. कारण ब्रेस्ट कॅन्सरनं ग्रस्त असलेल्या महिलांमध्ये असे दिसून आले आहे की ज्या महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते त्यांना ब्रेस्ट कॅन्सर  होण्याची शक्यता जास्त असते. वाढत्या गरमीच्या वातावरणात खोकला अन् तापापासून बचाव करतील हे ३ पदार्थ; वाचा एक्सपर्ट्सचा सल्ला

या पदार्थांचे सेवन करायला हवं

लसूण आणि कांद्याचे सेवन ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचवू शकते. 

द्राक्षं, मनुक्यांचा आहारात समावेश करायला हवा.

ग्रीन टी चे सेवन करायला हवे

आलं किंवा सुंठाचा आहारात समावेश करायला हवा. 

ब्रेस्ट कॅन्सरपासून  बचावासाठी या पदार्थांचे सेवन टाळा

दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त करू नका.

धुम्रपान करू नका.

चहा, कॉफीपासून लांब राहा.

उडीद किंवा मसूरच्या डाळीचे सेवन करा. 

अंडी, मासे यांचे अतिसेवन टाळा. पोषक तत्वाचं 'पावरहाऊस' ठरतं बीट; उन्हाळ्यात बीटाच्या सेवनानं शरीराला मिळतील हे ६ फायदे

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यBreast Cancerस्तनाचा कर्करोगcancerकर्करोगWomenमहिला