महिलांना नेहमीच वेट मॅनेजमेंटची चिंता सतावत असते. म्हणजेच वजन नियंत्रणात ठेवणे. पण हे वाटतं तेवढं सोपं नाही. कारण बदललेल्या लाइफस्टाईलमुळे खाण्या-पिण्याच्या सवयी फारच बदलल्या आहेत. अशात तुम्हालाही फिगर मेंटेन ठेवायचा असेल आणि अर्थातच वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. आज आम्ही तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश आवर्जून करावा हे सांगणार आहोत. कारण तुमचा ब्रेकफास्टच तुमच्या वजन नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतो.
हेल्दी ब्रेकफास्ट गरजेचा
वजन कमी करायचं असेल किंवा कमी झालेलं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल या दोन्ही स्थितींमध्ये तुमचा आहार महत्त्वाचा ठरतो. आहारातून तुम्हाला भरपूर पोषण मिळतं. ज्याने बॉडी टोन्ड आणि चेहऱ्यावर ग्लो कायम राहतो. जर तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट केलाच नाही तर हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
सकाळचा चहा
सकाळी चहा घेणे वाईट गोष्ट नाही. पण चहा रिकाम्या पोटी घ्याल तर आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. अशात जर तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल तर हेल्दी चहाचं सेवन करा. तुम्ही ब्रेकफास्टवेळी एक कप मसाला चहाचं सेवन करू शकता. जर तुम्हाला ब्लॅक टी आवडत असेल तर त्यात आलं आणि दालचिनी टाका. तसेच वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगली ग्रीन टी मानली जाते. कारण ग्रीन टी मध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे मेटाबॉलिज्म मजबूत करतात. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.
लिंबू पाणी
सकाळी रिकाम्या पोटी सेवन केलेलं लिंबू पाणी तुमचा वेगवेगळ्या समस्यांपासून बचाव करू शकतं. याने पोटाच्या वेगवेगळ्या समस्या सहज दूर होतात. तसेच याचा वजन कमी करण्यासही फायदा होतो. लिंबू पाणी रिकाम्या पोटी सेवन केलं तर तुमच्या मेटाबॉलिज्ममध्ये सुधारना होते. तसेच पचनक्रियाही चांगली राहते.
सफरचंद
सफरचंद हे फळ अनेक गुणांचा खजिना मानलं जातं. सफरचंदाची चव चांगली लागण्यासोबतच यातील फायबरने तुम्हाला अनेक फायदे होतात. हे फळ खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं. तसेच यात कॅलरी कमी असतात आणि पचनक्रियाही चांगली राहते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सफरचंद तुम्ही कुठेही कधीही खाऊ शकता.
बदाम
रात्री झोपण्यापूर्वी थोडे बदाम भिजत ठेवा आणि सकाळी त्यांची साल काढून खावे. याने आरोग्याला फार फायदा होतो. तसेच ब्रेकफास्टमध्ये एकच पदार्थ जास्त प्रमाणात खाण्याऐवजी काही वेगळ्या पदार्थांचाही समावेश करा. यात बदामही घेऊ शकता. बदामात प्रोटीन, फॅट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही. पोटी भरलेलं असल्याची जाणीव होते. तसेच तुम्ही एनर्जेटिकही वाटतं.