नाशिकच्या बॉक्सरांची बाजी

By Admin | Updated: July 10, 2015 00:35 IST2015-07-09T21:53:11+5:302015-07-10T00:35:11+5:30

नाशिक : विभागीय क्रीडा संकुल येथे ऊर्जा फिटनेस हबच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नाशिकच्या बॉक्सरांनी बाजी मारली. या स्पर्धेत नाशिकसह पुणे, मुंबई, जळगाव येथील बॉक्सर सहभागी झाले होते.

Boxer betting on Nashik | नाशिकच्या बॉक्सरांची बाजी

नाशिकच्या बॉक्सरांची बाजी

नाशिक : विभागीय क्रीडा संकुल येथे ऊर्जा फिटनेस हबच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नाशिकच्या बॉक्सरांनी बाजी मारली. या स्पर्धेत नाशिकसह पुणे, मुंबई, जळगाव येथील बॉक्सर सहभागी झाले होते.
या स्पर्धेत नाशिकचे प्रणील तांबडे, देवेंद्र कांदे, संदीप लोंढे यांनी सुवर्ण पदक पटकावून बाजी मारली. तसेच ४९ किलो गटात ताराचंद, ५२ किलो गटात अभिषेक कुमार, ५६ किलो गटात वीरेंद्र यादव, ६० किलो गटात जीवनसिंग, ६४ किलो गटात संदीप कुमार, ६९ किलो गटात दीपक यादव यांनी सुवर्ण पदक पटकाविले. भूपेन भोसले, निशाद विप्रा, परम चोक्सी, रज्जत बारगळ, मिहीर कातकाडे, वरद कहार यांनी रजत पदक पटकाविले. मुलीच्या गटात तानिया नेगी, नेहा खोब्रागडे यांनी बाजी मारली. या स्पर्धेत पंच म्हणून भोपाल नेगी, शशिकांत साठे, स्वप्नील बर्वे यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांचा ऊर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सिद्धांत चव्हाण, श्रीकांत साठे, भाऊलाल तांबोळी, संतोष कहार, हर्षल केंगे, शिवा कातड आदि उपस्थित होते.
(फोटो आहे)

Web Title: Boxer betting on Nashik