सिलिंडरच्या स्फोटात पती-पत्नी, दोघे मुले जखमी
By Admin | Updated: February 22, 2016 00:10 IST2016-02-22T00:03:53+5:302016-02-22T00:10:00+5:30
जळगाव : जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे सिलिंडरचा स्फोट होऊन पती-पत्नी व दोघ मुले जखमी झाले.

सिलिंडरच्या स्फोटात पती-पत्नी, दोघे मुले जखमी
जळगाव : जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे सिलिंडरचा स्फोट होऊन पती-पत्नी व दोघ मुले जखमी झाले. ही घटना रविवारी घडली.
शेंदुर्णी येथे दिलीप एकनाथ गुरव (३५) यांच्या घरी चहा करीत असताना अचानक सिलिंडरच्या रेग्युलेटरजवळ स्फोट झाला. त्यावेळी दिलीप गुरव यांनी लगेच पोत्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र तरीही या स्फोटात दिलीप गुरव हे १३ टक्के, त्यांची पत्नी राधाबाई गुरव (३०) सहा टक्के, मुलगा हर्षल गुरव (१२) एक टक्के तर दुसरा मुलगा भावेश गुरव (१०) हा पाच टक्के भाजला गेला. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर येथे उपचार सुरू आहे.