तळागाळापयंर्त रक्त सेवा पोहोचवण्यासाठी कटीबद्ध असावे

By Admin | Updated: March 14, 2016 00:21 IST2016-03-14T00:21:00+5:302016-03-14T00:21:00+5:30

जळगाव : समाजाच्या तळागाळापर्यंत रक्त सेवा पोहोचवण्यासाठी रक्तपेढींनी कटीबद्ध राहून त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे जनकल्याण रक्तपेढीचे प्रमुख डॉ.दिलीप वाणी यांनी केले.

The blood pressure must be tied to reaching the blood | तळागाळापयंर्त रक्त सेवा पोहोचवण्यासाठी कटीबद्ध असावे

तळागाळापयंर्त रक्त सेवा पोहोचवण्यासाठी कटीबद्ध असावे

गाव : समाजाच्या तळागाळापर्यंत रक्त सेवा पोहोचवण्यासाठी रक्तपेढींनी कटीबद्ध राहून त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे जनकल्याण रक्तपेढीचे प्रमुख डॉ.दिलीप वाणी यांनी केले.
माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी व इंडीयन मेडीकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर डॉ.दिलीप वाणी, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, सचिव डॉ.अनिल पाटील उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या स्वागतासह डॉ.स्नेहल फेगडे यांची सेंट्रल वर्किग कमिटी आय.एम. ए. दिल्ली येथे सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात रक्त संक्रमणाविषयी जबाबदारी या विषयावर डॉ.दिलीप वाणी यांनी रक्तसंकलन , रक्त पुरवठा तसेच रक्त पेढीसाठी लागणारे साहित्य घेतांना शासकीय कायदे व नियमांची माहिती दिली. रक्ताच्या गुणवत्तेच्या दृष्टीकोनातून कायद्याची वाट न बघता आधुनिक तंत्रज्ञान रक्त पेढीने स्वीकारावे असे डॉ. वाणी यांनी सांगितले.
दुसर्‍या सत्रात डॉ.महेंद्रसिंग चव्हाण यांनी रक्ताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नॅट तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. सध्या भारतात प्रचलित एलिसा टेस्टींग व नॅट तंत्रज्ञानाची तुलना सांगितली. जनकल्याण रक्तपेढी पुणे तेथील डॉ. अतुल कुलकर्णी यांनी रक्तातील नवीन संशोधनाबद्दल माहिती सांगताना पहिल्या सख्या नात्यातील रक्त रुग्णांना देऊ नये तसेच मूत्रपिंड, फुफ्फूस इत्यादी अवयव प्रत्यारोपण करतांना रक्त देतांना घ्यावयाच्या काळजीबद्दल माहिती दिली.
शेवटच्या सत्रात डॉ. विवेकानंद कुळकर्णी यांनी स्रीरोग व बालरोग या क्षेत्रात वापरण्यात येण्यार्‍या रक्ताबाबत माहिती देऊन उपस्थित डॉक्टरांचे शंकानिरसन केले. डॉ.अर्जुन भंगाळे, भरत अमळकर यांनीही मनोगतच व्यक्त केले.
सूत्रसंचालन डॉ.रवी हिरानी यांनी केले तर रक्तपेढीचे व्यवस्थापक भानुदास येवलेकर यांनी आभार मानले. १२० डॉक्टरांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलतर्फेडॉ. नंदन माहेश्वरी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी डॉ. धर्मेंद्र पाटील,डॉ.नलिनी वैद्य, किरण बच्छाव, तुफान शर्मा, विवेक पलोड, आनंद जोशी, मधुकर सैंदाणे, जयवंत पाटील, उज्वला पाटील, रश्मी नाटेकर यांनी परिश्रम घेतले.


Web Title: The blood pressure must be tied to reaching the blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.