शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

औषधीय गुणांचा खजिना आहे काळी हळद, अनेक आजारांपासून लगेच मिळते सुटका; वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 14:57 IST

Black turmeric Benefits :  काळी हळद सामान्यपणे भारताच्या पूर्वोत्तर आणि मध्य प्रदेशात उगवली जाते. काळ्या हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅंटीऑक्सीडेंट असतात. याचं वैज्ञानिक नाव आहे Curcuma caesia.

Black turmeric Benefits : हळदीच्या औषधीय गुणांमुळे याला जगभरात मोठी डिमांड आहे. हळदीने इम्यून सिस्टीमला बूस्ट करण्यासोबतच अनेक आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. हेच कारण आहे की, एक्सपर्ट्स दररोज काही प्रमाणात याचं सेवन करण्यास सांगतात.  हळदीचा विषय निघतात एक पिवळ्या रंगाचं पावडर समोर येतं. पण आता असं होणार नाही कारण हळद केवळ पिवळ्या रंगाची नसते. काळी हळदही आहे.  पण ही काळ्या आणि निळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये असते.

काळी हळद सामान्यपणे भारताच्या पूर्वोत्तर आणि मध्य प्रदेशात उगवली जाते. काळ्या हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅंटीऑक्सीडेंट असतात. याचं वैज्ञानिक नाव आहे Curcuma caesia. मणिपूर आणि काही राज्यांमध्ये लोकांसाठी याचं खास महत्व आहे. इथे याच्या मुळापासून तयार केलेल्या पेस्टने जखमा भरणे, साप किंवा विंचू चावल्यावर लावली जाते.

काळ्या हळदीत कोणते गुण?

एका रिसर्चनुसार,  फार कमी लोकांनाच काळ्या हळदीबाबत माहीत आहे. ही आयुर्वेदातील महत्वाच्या जडीबुटींपैकी एक आहे. यात अनेक प्रकारचे औषधी गुण आढळून येतात. ज्यात अ‍ॅंटीफंगल, अ‍ॅंटी अस्थमा, अ‍ॅंटीऑक्सीडेंट, एनाल्जेसिक, लोकोमोटर, डिप्रेसेंट, अ‍ॅंटीकॉन्वेलसेंट, अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी अल्सर आणि मांसपेशींना आराम देणारा प्रभाव, चिंताजनक आणि सीएनएस डिप्रेशन दूर करणारे गुण प्रामुख्याने आढळतात. ज्याने अनेक आजारांपासून बचाव होतो.

फुप्फुसाचा आजार होईल दूर

श्वासासंबंधी आजारांमध्ये काळी हळद फार फायदेशीर असते. यात अ‍ॅंटी इंफ्लेमेट्री गुण आढळून येतात. जे सर्दी, खोकला, अस्थमासारख्या आजारांपासून आराम देतात. याचा वापर तुम्ही पिवळ्या हळदीसारखाच करू शकता.

मायग्रेनमध्ये मिळतो आराम

मायग्रेनची समस्या जास्तकरून महिलांमध्ये बघायला मिळते. पण हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. यात डोक्याच्या मागे एका भागात असह्य वेदना होतात. मायग्रेनने पीडित व्यक्ती मोठा आवाज आणि प्रकाशाने संवेदनशील होतो. काळी हळद या समस्येत आराम देऊ शकते. आरामासाठी ताज्या हळदीचा लेप तयार करून कपाळावर लावा.

मासिक पाळीतही फायदेशीर

अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान असह्य वेदनांचा सामना करावा लागतो. अशात काळ्या हळदीतील अ‍ॅंटी इनफ्लेमेट्री गुण आराम देतात. यासाठी गरम दुधात काळ्या हळदीचं पावडर मिश्रीत करून पिण्याचा सल्ला देतात.

पंचनासंबंधी समस्या होते दूर

काळी हळद गॅस्ट्रिक समस्यांपासून सुटका मिळवून देण्याचं काम करते. अ‍ॅसिड रिफ्लक्स, गॅस, सूज, उचकी, अपचन, अल्सर, गॅस्ट्रिक इश्यू आहे. अनेक रूटीन बिघडल्याने आणि खाण्या-पिण्यामुळे ही समस्या होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काळ्या हळदीचं योग्य प्रमाणात सेवन पाण्यासोबत करावं.

(टिप - वरील लेखातील टिप्स या सामान्य माहितीवर आधारित आहेत. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. तुम्हाला काही समस्या असल्यास आणि यांचा वापर करण्याआधी डॉक्टरांशी एकदा संपर्क नक्की करा.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य