शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या हिरड्यांचा रंग काळा आहे का? जाणून घ्या याची कारणे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 15:03 IST

Black gums : हिरड्या काळ्या असणे हा हिरड्यासंबंधी एखाद्या समस्येचा संकेतही असू शकतो. त्यामुळे यावर दुर्लक्ष करून चालणार नाही. चला आज आम्ही तुम्हाला हिरड्यांचा रंग काळा असल्याची काही कारणे सांगणार आहोत. 

Black gums : हसताना हिरड्या दिसतात, त्यामुळे इतरवेळी गप्पा करताना यावर लोकांची नजर जात नाही. सामान्यपणे हिरड्यांचा रंग हा लाल किंवा गुलाबी असतो. जसा तोंडाचा आतील भागाचा रंग असतो. पण अनेकदा काही लोकांच्या हिरड्यांचा रंग काळा असतो. पण याचं कारण काही कुणाला माहीत नसतं. काळ्या हिरड्यांमुळे हसताना अनेकांना अवघडल्यासारखंही वाटतं.  

त्यासोबतच हिरड्या काळ्या असणे हा हिरड्यासंबंधी एखाद्या समस्येचा संकेतही असू शकतो. त्यामुळे यावर दुर्लक्ष करून चालणार नाही. चला आज आम्ही तुम्हाला हिरड्यांचा रंग काळा असल्याची काही कारणे सांगणार आहोत. 

मेलानिन जास्त जमा झाल्याने

onlymyhealth.com या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सामान्यपणे ज्या लोकांची त्वचा काळी असते, त्यांच्या शरीरात मेलानिन जास्त जमा झालेलं असतं. अशा लोकांच्या हिरड्या काळ्या रंगाच्या असतात. मेलानिन एकप्रकारचं तत्व आहे, ज्याला त्वचा नैसर्गिकपणे तयार करते आणि याने त्वचेचा रंग डार्क होतो. त्यामुळे जर त्वचा काळी असेल तर शक्य आहे की, तुमच्या हिरड्या गुलाबी न राहता काळ्या असतील. तशी तर काळे हिरड्या असणे ही काही समस्या नाही. पण हिरड्यांवर केवळ काळे डाग दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण ही बाब सामान्य नाही.

काही औषधांचा वापर

काही औषधांचे साइड इफेक्ट्समुळेही हिरड्यांचा रंग काळा होऊ शकतो. एका रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, काही खास डिप्रेशनच्या औषधांमुळे, मलेरियाची औषधे आणि अ‍ॅंटी-बायोटिक्सच्या सेवनामुळे व्यक्तीच्या हिरड्या काळ्या दिसू शकतात. जर काही दिवसांपासून तुम्ही असं काही औषध घेत असाल आणि तुम्हाला तुमच्या हिरड्या काळ्या झालेल्या दिसत असतील तर वेळीच याबाबत डॉक्टरांशी बोला.

धुम्रपान केल्याने

हे तर तुम्हाला माहीत असेलच की, धुम्रपान केल्याने कॅन्सर, फुप्फुसांची समस्या, श्वासांची समस्या, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक इत्यादींचा धोका वाढतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, धुम्रपान केल्याने तुमच्या हिरड्यांचा रंगही काळा होऊ शकतो. जे लोक सिगारेट, विडी जास्त सेवन करतात त्यांनाही ओठांच्या आणि हिरड्यांच्या काळेपणाची समस्या होऊ शकते. धुम्रपानाच्या सवयीमुळे तुमची स्माइलही खराब होऊ शकते. अनेकदा हिरड्यांचा रंग काळा होण्याऐवजी हिरड्यांवर काळे डाग दिसू लागतात. हे तोंडाच्या कॅन्सरचे सुरूवातीचे लक्षणे असू शकतात. त्यामुळे असे संकेत दिसत असतील तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.

जिंजिवायटिसच्या कारणाने

हिरड्यांचा एका खास आजार असतो. ज्याला अल्सरेटिव जिंजिवायटिस असं म्हणतात. हे एकप्रकारचं इन्फेक्शन आहे. यामुळेही हिरड्यांमध्ये वेदना, ताप आणि श्वासाच्या दुर्गंधीची समस्या होऊ शकते. या इन्फेक्शनमुळे हिरड्यांचे टिशूज मरतात. ज्यामुळे त्यांचा रंग काळा होऊ शकतो. जर तुम्हाला जिंजिवायटिसची समस्या असेल तर लवकरात लवकर यावर डॉक्टरांशी बोलून उपचार घ्यावे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य