शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोठी घोषणा! राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या ४ हजार जागांची भरती करणार, सरकारची विधानसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 12:11 IST

Maharashtra Assembly Winter Session: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय मंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे

नागपूर-

नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारनं महत्वाची घोषणा केली आहे. राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या जवळपास साडेचार हजार जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार आहे. नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी गिरीश महाजन यांनी याबाबतची घोषणा विधानसभेत केली. 

"आम्ही एमपीएसच्या माध्यमातून ३०० डॉक्टरांची भरती केली. पण सध्या २८ टक्के जागा रिक्त आहेत. यासंदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती केली जाईल. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एमपीएससी (MPSC) मार्फत जागा भरण्यास वेळ लागतो", असं गिरीश महाजन म्हणाले. तसंच राज्य आत्तापर्यंत १० टक्के हॉस्पिटल आणि ९० टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होतं, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलून आता ३० टक्के हॉस्पिटल आणि ७० टक्के हाफकिन अशी औषधं खरेदी केली जाईल, अशीही माहिती गिरीश महाजन यांनी दिली. 

नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे रुग्णांची संख्या मोठी असते. व्हेंटिलेटर तत्काळ उपलब्ध करायची म्हटलं तरी ते शक्य होतं नाही. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. कारण रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात आहे. लवकरच जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात येईल, असंही महाजन म्हणाले. 

२०२४ पर्यंत जेजे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलराज्यात १० हजार खोल्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी बांधण्याची गरज असून आम्ही सीएसअरच्या माध्यमातुन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत, असं महाजन म्हणाले. २०२४ पर्यंत जे जे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल करत असल्याचंही गिरीश महाजन यांनी सांगितलं. तसेच रिचर्ड अँड क्रुडास येथील जागा जी ९९ वर्षाच्या करारावर देण्यात आली होती. त्यांची मुदत २० वर्षांपूर्वी संपली आहे. ती जागा जे.जे. ला मिळाली तर मोठा फायदा होईल. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. अपेक्षा आहे लवकरच निर्णय लागेल, असंही महाजन म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यGirish Mahajanगिरीश महाजन