शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

सावधान! रोजच्या वापरातल्या दुधात डिटर्जंट तर मिसळलेले नाही ना?; 'अशी' करा चाचणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 16:17 IST

लेखात दिलेल्या टिप्स वापरून घरच्या घरी भेसळयुक्त दुधाची चाचणी करा आणि भेसळ आढळल्यास ताबडतोब तक्रार नोंदवा. 

दिवसेंदिवस दुधाचे भाव वाढत चालले आहेत. मात्र त्याची शुद्धता ढासळत आहे. कधी दुधापेक्षा पाणी जास्त तर कधी सायीऐवजी चिकट पदार्थ जास्त! यामुळे त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. अलीकडे तर चक्क डिटर्जंट वापरून दूध विकल्याचेही पाहण्यात आले. त्यामुळे पैशांचा चुराडा तर होतोच पण आरोग्याशीही खेळ होतो, म्हणून डॉ. भोरकर आपल्याला सदर लेखात दुधातील भेसळ कशी ओळखावी या संदर्भात टिप्स देत आहेत त्या पाहू. 

दुध हे आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी लोकं दुध पितात. परंतु याच दुधामुळे तुमच्या शरीराला आता धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दुधात भेसळ होण्याच्या बातम्या सध्या समोर येत आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की दुधात भेसळ करण्यासाठी फक्त पाणीच नाही तर, आणखी काही गोष्टींचाही वापर करण्यात येतो जे आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. त्यामुळे दुधात काय काय भेसळ केलेली असू शकते हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

कृत्रिम दुधाची ओळख 

दुधातील भेसळ वासाने ओळखता येऊ शकते. जर त्याला साबणाचा वास येत असेल तर हे दूध कृत्रिम आहे. कारण खऱ्या दुधाला साबणाचा वास येत नाही. त्याच वेळी, एका वाडग्यात दुधाचे काही थेंब टाका आणि त्यात हळद मिक्स करा. जर हळद लगेच घट्ट होत नसेल, तर याचा अर्थ असा होतो की, त्यात भेसळ झाली आहे.

दुधात डिटर्जंट भेसळ 

ही भेसळ पाहाण्यासाठी सर्वप्रथम थोडे दूध आणि पाणी समान प्रमाणात घ्या. त्याला नीट ढवळून हलवा असे केल्याने दुधाला फेस येईल, थोड्याप्रमाणात फेस येणे सामान्य आहे परंतु जास्त आणि साबणासारखा जास्त फेस आला तर समजुन जा की, यात डिटर्जंटची भेसळ केली आहे.  या व्यतिरिक्त, आपल्या तळहातावर थोडे दूध चोळा. जर दुधात डिटर्जंटची भेसळ असेल, तर तुम्हाला तुमच्या हातावर फेस जाणवेल. 

दूधात पाण्याची भेसळ 

बऱ्याचदा लोकांना शंका येते की, दुधात पाणी मिसळले आहे परंतु हे तपासण्याचा किंवा हे सिद्ध करण्याचा त्यांच्याकडे काही पर्याय नसतो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की तुम्ही घरी साध्या पद्धतीने दुधात पाण्याची होणारी भेसळ तपासू शकता. सर्व प्रथम, गुळगुळीत लाकडी किंवा दगडाच्या पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका. शुद्ध दुधाचा एक थेंब हळूहळू पांढरा रंग सोडून वाहून जाईल, तर भेसळयुक्त पाण्याचा एक थेंब कोणताही रंग किंवा डाग न सोडता वाहून जाईल.

युरियाचा वापर 

युरियाचा वापर दूध घट्ट करण्यासाठीही केला जातो. हे तपासण्यासाठी, तुम्ही टेस्ट ट्यूबमध्ये एक चमचा दूध घाला. त्यात अर्धा चमचा सोयाबीन किंवा तूर पावडर घालून चांगले मिक्स करा. थोड्यावेळानंतर त्यात लाल लिटमस पेपर टाका, अर्ध्या मिनिटानंतर जर हा लाल रंग निळा झाला तर दुधात युरिया मिसळला आहे.

जर आपल्याला या पद्धतीने दुधाची गुणवत्ता ठरवता येत नसेल तर आपल्या जवळील लॅब मध्ये ही टेस्ट करू शकता. मात्र भेसळ आढळल्यास तेवढ्यावर न थांबता सदर विक्रेत्याबद्दल लेखी तक्रार अवश्य नोंदवा. कारण हा सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न आहे!

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स