शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीही कान स्वच्छ करण्यासाठी इयर बड्स वापरता?; वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 19:40 IST

कानात मळ जमा होणे ही सामान्य गोष्ट आहे. आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच ही समस्या उद्भवते. धूळ, माती किंवा आंघोळ करताना साबण कानामध्ये गेल्यामुळे अनेकदा कानांच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

कानात मळ जमा होणे ही सामान्य गोष्ट आहे. आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच ही समस्या उद्भवते. धूळ, माती किंवा आंघोळ करताना साबण कानामध्ये गेल्यामुळे अनेकदा कानांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे वेळोवेळी कानांची स्वच्छता करणंही गरजेचे असतं. योग्यप्रकारे स्वच्छता न झाल्यास किंवा कानात जास्त मळ जमा झाल्यास कान दुखणे, खाज येणे, जळजळ होणे, कमी ऐकायला येणे अशा समस्या होऊ शकतात. अनेकजण कान स्वच्छ करण्यासाठी इयर बड्सची मदत घेतात. लोकांचा असा समज असतो की, यामुळे कानांची स्वच्छ उत्तम प्रकारे करणं सहज शक्य होतं. पण असं करणं खरचं घातक ठरू शकतं. तुम्हीही कानांच्याबाबतीत असचं काहीसं करत असाल तर वेळीच असं करणं थांबवा. जाणून घेऊया इयर बड्सचा वापर करून कान स्वच्छ केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत...

1. इयर बड्सचा वापर करून कान स्वच्छ केल्यामुळे कानात जमा झालेला मळ बाहेर येण्याऐवजी कानाच्या आतमध्ये जाण्याची शक्यता असते. ज्यामुळे कानांच्या नाजूक पडद्याला नुकसान पोहोचते. यामुळे ऐकायलाही त्रास होतो. 

2. इयर बड्सवर कापूस लावण्यात आलेला असतो. अनेकदा तर कापसाचा काही भाग आतमध्ये राहतो आणि आंधोळीदरम्यान पाणी गेल्यामुळे तो कापूस ओला होत राहतो. परिणामी कानाच्या आतमध्ये फंगल इन्फेक्शन होतं. 

3. इयर बड्सचा दररोज वापर केल्यामुळे कानाच्या आतील त्वचेलाही नुकसान पोहचू शकतं. कारण कानाच्या आतमध्ये असलेली त्वचा तुलनेने अत्यंत संवेदनशील असते. 

4. कानामध्ये नॅचरली ओलसर द्रव्य तयार होत असते.  हे चिकट द्रव्य कानामध्ये तयार होणारा मळ कानाच्या पडद्यापर्यंत पोहचू देत नाही. जेव्हा आपण इयर बड्सचा वापर करून कान स्वच्छ करतो त्यावेळी कानाचतील हे द्रव्यही स्वच्छ होतं. ज्यामुळे धूळ, माती कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचते. 

5. कानाच्या आतमध्ये असणारा पडदा किती लांब आहे हे आपल्याला माहीत नसेत. अशातच आपण जेव्हा इयर बड्स कान स्वच्छ करण्यासाठी वापरतो त्यावेळी तो आतपर्यंत जाउन कानाच्या पडद्याला नुकसान पोहोचवू शकतो. 

6. कान स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इयर बड्सवर असणाऱ्या कापसावर अनेक बॅक्टेरिया असतात. ज्यावेळी आपण कान स्वच्छ करण्यासाठी इयर बड्सचा वापर करतो त्यावेळी हे बॅक्टेरिया कानाच्या आतपर्यंत जावून इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी