शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

धमन्यांमध्ये जमा होणारं प्लाक ठरू शकतं हार्ट अटॅकचं कारण,असा करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 14:07 IST

जास्त फॅट्स असलेल अन्नपदार्थ आणि अनियमीत जीवनशैली आपल्या आयुष्याचा भाग बनली आहे.

हृदयातून संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह होत असतो.  त्यामुळेच आपलं शरीर सुरळीत कार्य करत असतं. पण हृदयाच्या नसांमध्ये काहीही समस्या निर्माण झाल्यास चिंतेच कारण असू शकतं.  सर्वाधिक ३५ चे ४० वयातील लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकने होतो.  हार्ट अटॅकचं सगळ्याचं मोठं कारण धमन्यांमध्ये जमा झालेले प्लाक हे आहे. कारण जास्त फॅट्स असलेल अन्नपदार्थ आणि अनियमीत जीवनशैली आपल्या आयुष्याचा भाग बनली आहे.

हृदयातील आर्टरीजमध्ये जमा झालेले प्लाक ब्लॉकेजचं कारण ठरतात. धमन्यांमध्ये प्लाक जमा झाल्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहोचू शकत नाही. त्यामुळे हार्ट अटॅक येतो. आर्टरीज प्रमुख काम हृदयाद्वारे पंप केले जाणारे रक्त शरीरात पोहोचवण्याचं असतं. वाढत्या वयात प्लाक जमा होण्याची समस्या वाढत जाते. धमन्यांमध्ये प्लाक जमा होणं हे जीवघेणं ठरू शकतं. आज आम्ही तुम्हाला यापासून बचावाचे उपाय सांगणार आहोत. जेणेकरून जमा आर्टरीजमध्ये जमा होत असलेल्या प्लाकला रोखता येऊ शकतं.

नियमित व्यायाम केल्याने तुमचं शरीर चांगलं राहील. त्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉचं प्रमाण वाढणार नाही. रोज व्यायाम केल्याने शरीराच एचडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. त्यामुळे धमन्यांमध्ये प्लाक जमा होत नाही. 

ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यासाठी मीठ फार महत्वाचे असते. पण प्रमाणाबाहेर मीठा खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी आहारात मीठाचे प्रमाण योग्य ठेवले पाहिजे.

रोज ओमेगा -3 फॅटी एसिड असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा त्यामुळे कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील, आहारात रोज दोन चमचे ऑलिव्ह ऑईल जाऊ द्या. फळे आणि भाज्या, कडधान्‍य यांचा आहारात समावेश करा. जेवणाची वेळ चुकवू नका. तेलकट पदार्थ टाळा.  यामुळे हृदय तंदुरुस्त राहण्‍यासाठी मदत होईल.

पुरेशा झोपेमुळे हृदयाचे आरोग्य  चांगले ठेवण्‍यासाठी मोठी मदत होते. पुरेशी झोप नसेल तर उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.  रोज ८ तासांची झोप व्हायलाच हवी.

तंबाखूत असलेला कार्बन मोनॉक्साईड रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतो. त्यामुळे हृदयाला शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यामध्ये बाधा येते. परिणामतः हृदयाचे ठोके वाढतात. तसंच धुम्रपानामुळे धमन्यांचे सुद्धा नुकसान होते. त्यामुळे हृदयाच्या विकारांपासून लांब राहायचं असेल तर मादक पदार्थांचे सेवन करू नका.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य