शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

'या' सुपरफुड्समुळे मेंदु होईल इतका तल्लख की कोणतीही समस्या चुटकीसरशी सोडवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 15:16 IST

आम्ही तुम्हाला असे काही खाद्यपदार्थ सांगणार आहोत जे खाल्ल्यावर तुमची स्मरणशक्ती कैकपटीने वाढेल. तसेच तुमच्या मेंदुचे कार्यही अधिक उत्तमरित्या चालेल. त्याचा प्रभाव तुम्हाला काही दिवसांत जाणवू लागेल.

मेंदु कार्यक्षम राहण्यासाठी उत्तम आहार आवश्यक असतो. आम्ही तुम्हाला असे काही खाद्यपदार्थ सांगणार आहोत जे खाल्ल्यावर तुमची स्मरणशक्ती कैकपटीने वाढेल. तसेच तुमच्या मेंदुचे कार्यही अधिक उत्तमरित्या चालेल. त्याचा प्रभाव तुम्हाला काही दिवसांत जाणवू लागेल.

बदामबदाम रात्रीच्या वेळी पाण्यात भिजायला टाका. सकाळी त्यांची साल काढुन घ्या. बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा. एक ग्लास दूध गरम करा. त्यात ही पेस्ट टाका. त्यात ३ चमचे मध टाका. दूध जेव्हा कोमट असेल तेव्हा प्या. यानंतर दोन तास काही खाऊ नका.

कॉफीसकाळी कॉफी घेणारे लोक हे कॉफी न घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत उत्साहाने काम करतात. दुपारीही त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो. कॅफिनमुळे आपण सक्रिय राहतो, मुड फ्रेश राहतो.

अक्रोडयात अँटीऑक्सिडंट असतात. दिवसभरात सात आक्रोड खाल्ले तर अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतात. सोबत कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते. स्मरणशक्ती वाढविण्यास मदत होते. २० ग्रॅम अक्रोड आणि १० ग्राम मुनका एकत्र खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.

ग्रीन टीग्रीन टी मेंदुसाठी लाभदायी आहे. यामुळे मेंदुच्या कोशिकांची निर्मिती, स्मरणशक्तीत सुधारणा, एखादी गोष्ट शिकण्याची क्षमता वाढते.

वेलचीयाचे तेल स्मरणशक्ती वाढविण्यासाठी लाभदायी आहे. हे तेल कॅलेस्ट्रॉल कमी करते. त्यामुळे मेंदु गतीने काम करतो. हे तेल डोक्याला थंडावा प्रदान करते. तणावात काम करतानाही डोके शांत राहते.

रोज मेरी ऑईलनैसर्गिक पद्धतीने स्मरणशक्ती वाढवायची असेल तर रोज मेरी तेलाचा फार फायदा होतो. यात औषधी गुणधर्म असतात. याने मेंदुची ताकद वाढते. त्यामुळेच याला ब्रेन टॉनिक असेही म्हटले जाते. अगदी पुरातन काळापासून याचा वापर केला जातो. तिखट वासामुळे जेवण तयार करण्यातही याचा उपयोग केला जातो. सुगंध चिकित्सेतही याचा वापर केला जातो. याच्या तिखट वासाने मेंदु तल्लख होतो व मेंदुची कार्यक्षमता वाढते.

सफरचंदयातील पेक्टिन नावाचे फायबर आहे. याने इम्युन सपोर्टिव्ह प्रोटिन्सचा स्तर वाढतो. त्यामुळे दिवसातून एक सफरचंद खायला हवे. त्याने तुम्हाला आजारपण येणार नाही. याने स्मरणशक्तीही वाढते.

हिरव्या भाज्या ब्रोकोली, पालक, शेपू, मेथी असा हिरव्या भाज्यांमध्ये लोह, जीवनसत्त्वे ई, के आणि बी 9 (फोलेट) समृध्द असते आणि मेंदूच्या पेशींच्या विकासासाठी व्हिटॅमिन सी सारख्या फायटोन्यूट्रिएंट्स महत्वाच्या असतो. व्हिटॅमिन के मानसिक सतर्कता वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स