शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

बेल फळाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 12:10 IST

बेलाच्या रसाचे उन्हाळ्यात अनेक फायदे होतात. बेलाचा वापर आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच तुमचं सौंदर्य चांगलं ठेवण्यासाठीही होऊ शकतो. आयुर्वेदातही बेलाचे गुण सांगण्यात आले आहेत. 

(Image Credit : tipshealthline.com)

मुंबई : उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही करणाऱ्या गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या थंड पेयांचं सेवन करतात. यातील एक सर्वात फायद्याचा रस म्हणजे बेल फळाचा रस. बेलाच्या रसाचे उन्हाळ्यात अनेक फायदे होतात. बेलाचा वापर आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच तुमचं सौंदर्य चांगलं ठेवण्यासाठीही होऊ शकतो. आयुर्वेदातही बेलाचे गुण सांगण्यात आले आहेत. 

बेल फळाचा रस तुमच्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. उन्हाळ्यात दररोज बेल फळाचा रस घेतल्यास याचा फायदा तुम्हाला पुढील काही दिवसातच बघायला मिळेल. बेल फळात प्रोटीन, थायमीन, रायबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन सी सारखे आणखीही काही पोषक तत्वे आढळतात.

गॅस आणि पोटदुखीपासून आराम

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि ऑफिसमध्ये तासनतास बसून राहिल्याने गॅस, पोटदुखी यांसारख्या समस्या होणं ही सामान्य बाब झाली आहे. खासकरुन कमी वयाच्या लोकांना याचा जास्त त्रास होऊ लागला आहे. तुम्हालाही ही समस्या असेल तर दररोज बेलाच्या फळाचा रस घ्यावा. याने तुम्हाला होणारा त्रास कमी होईल. 

कोलेस्ट्रॉल करा कंट्रोल

जर तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातील कुणाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर बेलाच्या रसाने तुम्हाला आराम मिळेल. बेल फळाच्या रसाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. यामुळे ब्लड शुगरही कंट्रोल होतं.

हृदयाचे आजार असलेल्यांसाठी फायद्याचा

हृदयाच्या वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी बेल फळाचा रस सेवन करणे रामबाण उपाय आहे. यासाठी बेलाच्या रसात एक चमचा तूप मिश्रित करुन रोज घ्या. याने तुम्हाला आराम मिळेल. 

डिहायड्रेशन-अॅसिडिटीपासून आराम

डिहायड्रेशनची समस्या असलेल्यांसाठी बेलाचा रस फारच उपयुक्त मानला जातो. यात तुम्ही गूळ किंवा साखर मिश्रित करुन सेवन करु शकता. जर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या असेल तर याने तुम्हाला लगेच आराम मिळेल. 

तोंडाच्या फोडांपासून आराम

तोंडाला फोडं येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे पोट बिघडणे हे आहे. जर तुम्हाला तोंडात फोडं आले असतील तर बेलाचा रस सेवन करा. याने पोटाची समस्या दूर होईल आणि तुमच्या तोंडात आलेल्या फोडांचा त्रासही कमी होईल. कारण हा रस प्यायल्याने शरीर थंड होतं. 

रक्त शुद्ध करण्यास मदत

रक्त साफ नसल्याने तुम्हाला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. यातून तुम्हाला सर्वात जास्त स्कीनच्या समस्या उद्भवतात. अशात बेलाचा रस आणि त्यात दोन थेंब मध मिश्रित करुन घ्यावे. याने तुम्हाला आराम मिळेल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स