शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उलटे चालण्याचेही असतात बरेच फायदे, फायदे तुमच्या कल्पनेपलीकडचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 15:55 IST

चालणे हा शरीरासाठी सर्वोत्तम असा व्यायाम कधीही व कोठेही करता येतो. दररोज काही मिनिटे चालणे शरीर व आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र काहीवेळा या व्यायामामध्ये बदल करणे देखील फायदेशीर ठरते. उलटे चालण्याचे (walking backwards)देखील शरीराला अधिक फायदे होतात.

चालणे (walking) हा शरीरासाठी सर्वोत्तम असा व्यायाम कधीही व कोठेही करता येतो. दररोज काही मिनिटे चालणे शरीर व आरोग्यासाठी (health) चांगले आहे. मात्र काहीवेळा या व्यायामामध्ये बदल करणे देखील फायदेशीर ठरते. उलटे चालण्याचे देखील शरीराला (benefits of walking backwards) अधिक फायदे होतात. स्पोर्ट्स मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार उलटे चालणे आणि धावणे हा चांगला कार्डिओ आहे. याचा वजन कमी करण्यासाठी देखील फायदा होतो. असेच काही उलटे चालण्याचे फायदे जाणून घेऊया.

पायांची ताकद वाढते सर्वसाधारणपणे आपण सरळ चालतो, त्यावेळी पायांच्या पुढील स्नायूंवर परिणाम होता. मात्र मागील स्नायूंवर याचा परिणाम होत नाही. मात्र जेव्हा तुम्ही उलटे चालता, त्यावेळी या स्नायूंची देखील हालचाल होते व पाय अधिक मजबूत होतात.

शरीराच्या तोल सावरण्यात सुधारणा उलटे चालत असताना आपण नेहमी पेक्षा वेगळी क्रिया करत असतो, त्यामुळे अशा स्थितीत शरीराचा समन्वय साधत तोल सांभाळणे गरजेचे असते. यामुळे तुमचा मेंदू विशिष्टरित्या तुम्हाला सुचना देतो आणि त्याचा फायदा शरीराचा तोल सांभाळण्यात होतो.

गुडघ्यांवर कमी ताण येतो एमसी मस्क्यूलोस्केलेटल डिसऑर्डर जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, ज्या लोकांच्या गुडघ्यात वेदना होतात, अथवा दुखापत झालेली असते अशी लोक उलटे चालू शकतात. ज्यामुळे गुडघ्यांवर अधिक ताण पडत नाही.

पाठदुखीची समस्या होत नाही हॅमस्ट्रिंग्सची समस्या तुमच्या पाठदुखीचे कारण ठरू शकते. हे टाळण्यासाठी दररोज १५ मिनिटे उलटे चालणे फायदेशीर ठरते. यासोबतच आणखी एक फायदा म्हणजे वजन कमी होण्यास देखील यामुळे मदत होते.

उलटे चालताना ही काळजी घ्याट्रेडमिलवर उलटे चालत असाल तर वेग कमी ठेवा, अन्यथा तुम्ही घसरून पडू शकता. घरात उलटे चालत असाल तर आजुबाजूला फर्निचर अथवा इतर वस्तू नसतील याची काळजी घ्या. पायाच्या टाचा सुरक्षित ठेवण्यासाठी बुट घाला. बाहेर उलटे चालत असाल तर प्राणी, व्यक्ती, खड्डे या गोष्टींची काळजी घ्या.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स