अनेक लोक हिवाळ्यात सॉक्स घालून झोपत असतात. काहीजणांना सॉक्स घालायला आवडतं. तर काहीजणांना आवडत नाही. हिवाळ्यात लगेच झोप येण्यासाठी सॉक्स घालून झोपणं फायदेशीर ठरतं असतं. काहीजण कामानिमित्त बाहेर जाताना चप्पल, सॅण्डल घालणं टाळतात. शुज घातल्यामुळे दिवसभर पायात मोजे असतात. आज आम्ही तुम्हाला सॉक्स घालून झोपण्याचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत.
रक्तप्रवाह व्यवस्थीत राहतो.
जर तुम्ही मोजे घालून झोपत असाल तर शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहत असतो. रक्तप्रवाह ऑरक्सीजनच्या प्रवाहाला व्यवस्थित करत असतो. ज्यात मासंपेशी आणि फुप्पुसं तसंच हद्याचे आरोग्य काम करण्यासाठी चांगलं असतं.
थर्मोरेगुलेशन
आपल्या शरीरातील तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी सॉक्स घालून झोपणं फायदेशीर ठरत असतं. थंडीच्या दिवसात जर तुम्ही सॉक्स घालून झोपलात तर थंडीचा जास्त त्रास जाणवत नाही.
रायनॉड
रायनॉड (Raynaud) सिंड्रोम हा असा आजार आहे. ज्या आजारात तुमचं शरीर आणि हाताची, पायांची बोटं सुन्न होतात. कारण पाय गारठलेले असतात. यामुळे गंभीर समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते. काहीवेळा हातापायाची बोटं वाकडे होत असतात. लकवा होण्याची स्थिती सुद्धा उद्भवू शकते. जर सॉक्सचा वापर केलात तर शरीर चांगलं राहील.
हॉट फ्लॅशेसम
हॉट फ्लैशेसचा त्रास रजोनिवृत्तीची वेळ जेव्हा येते. तेव्हा महिलांना हा त्रास जाणवत असतो. त्यामुळे हार्मोन्सचे परिवर्तन होत असते. महिलांना लवकर झोप येत नाही. अशावेळी सॉक्स घालून झोपल्यानंतर ही समस्या रोखता येऊ शकते .
मोजे घालून झोपण्याचे तोटे
रक्तप्रवाहावर परिणाम
ज्याप्रकारे रक्तप्रवाहावर सकारात्मक परीणाम मोजे घातल्यावर होत असतो. त्याचप्रमाणे रक्तप्रवाह असुरळीत सुद्धा होऊ शकतो. कारण जर तुमचे मोजे घट्ट असतील तर पायांच्या नसांना रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. (हे पण वाचा-'या' लोकांना असतो त्वचेच्या कॅन्सरचा सर्वाधिक धोका, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा!)
स्वच्छता
अंथरूणात मोजे घालून झोपल्यामुळे ऑक्सिजन पुरेश्या प्रमाणात पोहोचत नाही. यामुळे इन्फेक्शन आणि दुर्गंध येण्याची समस्या उद्भवत असते. त्यामुळे झोपण्याआधी जर तुम्ही मोजे घालत असाल तर ते रोजच्या रोज धुतलेले असावेत. झोपताना जर तुम्ही सॉक्स घालत असाल तर हवा खेळती राहत नाही. त्यामुळे ओवरहिटींग होण्याची शक्यता असते. (हे पण वाचा-कोरोना व्हायरसचा धोका महिलांच्या तुलनेत पुरूषांना अधिक - रिसर्च)