शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पालकसारखी दिसणारी 'ही' आरोग्यदायी भाजी, फायदे वाचाल तर रोजच सेवन कराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 13:09 IST

केल अनेक प्रकारे आहारात समाविष्ट केले जाऊ शकते आणि आपण ते कच्चे किंवा शिजवून दोन्ही प्रकारे खाऊ शकता.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या बुधवारी केल डे साजरा केला जातो. केल ही भाजी अगदी सामान्य दिसत असली तरीदेखील तिचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ही एक हिरवी, पालेभाजी आहे ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. ही संपूर्ण शरीरासाठी आरोग्यदायक आहे. केल अनेक प्रकारे आहारात समाविष्ट केले जाऊ शकते आणि आपण ते कच्चे किंवा शिजवून दोन्ही प्रकारे खाऊ शकता.

WebMD नुसार, केल हे एक सुपरफूड आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीरातील रक्त आणि हाडे तयार होण्यासोबतच आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. त्यात अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, फोलेट आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन बी देखील असते. केल मोतीबिंदूची समस्या दूर ठेवण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि कर्करोगापासून बचाव करण्यासदेखील मदत करू शकते.

या 5 मार्गांनी करा आहारात सामील

सॅलड
केल तुम्ही सॅलडमध्ये घालूनदेखील खाऊ शकता. यासाठी केल बारीक चिरून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची आणि 1 चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घाला. तुम्ही त्यात ऑलिव्ह ऑईल, मूग किंवा हरभरादेखील घालू शकता.

सूप
केलचे सूप खूप चविष्ट आणि आरोग्यदायी असते. हे बनवण्यासाठी केल, 1 मोठा टोमॅटो, 2-3 बीन्स, 1 तुकडा दालचिनी, अर्धा चमचा जिरे आणि मीठ उकळवा. नंतर ते चांगले घेऊन फेटून गाळून घ्या.

चिप्स किंवा पकोडे
जर तुम्हाला स्नॅक बनवायचा असेल तर एका भांड्यात बेसन पीठ, थोडी लसूण पेस्ट, अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल, मीठ आणि कोथिंबीर टाकून एकत्र करा आणि या पेस्टमध्ये केलची पाने घाला. आता तुम्ही ते तळून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता.

स्मूदी
केल स्मूदी बनवण्यासाठी एक कप बदामाचे दूध घ्या आणि त्यात 1 मूठभर केळीची पानं घाला. आता त्यात 1 टीस्पून मध, अर्धा केळी, 1 टीस्पून अननस आणि 1 टीस्पून पीनट बटर घालून मिक्स करा. जर मिश्रण जास्त घट्ट झाले असेल तर त्यात आणखी थोडे बदामाचे दूध घालून ते पातळ करू शकता.

पराठा
केल बारीक चिरून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक करा. आता त्यात मल्टीग्रेन पीठ मिक्स करून पराठा बनवा. गरमागरम पराठे पीनट बटरबरोबर सर्व्ह करा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स