शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ना जिम, ना डायटिंग; फक्त हळदीचा असा करा वापर, पोटाची चरबी वितळेल सरसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 16:04 IST

आजकाल धावत्या जीवनशैलीमुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढताना दिसते.

How to use Turmeric for Weight Loss: आजकाल धावत्या जीवनशैलीमुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढताना दिसते. वाढत्या लठ्ठपणामुळे, वजनामुळे सकाळच्या व्यायामापासून ते आहारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोक चिंतेत असतात. हल्ली लोक वजन कमी करण्यासाठी काहीही करु शकतात. पण थंडीच्या दिवसांमध्ये वजन कमी करणे अवघड होऊन जाते. दिवसभर बसून कामे केल्याने आपोआपच वजन वाढते आणि पोटावर चरबीचा घेर वाढू लागतो. 

काही केल्या जर वजन कमी होत नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपायही करून पाहावेत. आज आम्ही तुम्हाला घरात सहज उपलब्ध असणाऱ्या हळदीचे फायदे सांगणार आहोत.

NCBI ने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार वाढलेले वजन कमी करण्यासाठी हळदीचे पाणी फायदेशीर ठरते. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी  नामक घटक आढळतात. शिवाय यामध्ये असणाऱ्या ‘करक्युमीन’मुळे शरीरातील फॅट सहज कमी होते असे तज्ञ सांगतात.

एका अध्ययनानुसार, वजन कमी करण्यासाठी ४४ लोकांवर केलेल्या यशस्वी प्रयोगामध्ये दिवसातून  दोन वेळा हळदीचे सेवन केल्यास त्यांचा बीएमआय कमी होतानाचे आढळले. याशिवाय कमरेच्या खालील भागामधील चरबीदेखील कमी झाली. 

हळदीमध्ये विटामीन सी, पोटॅशिअम, प्रोटीन, फायबर ,कॅल्शिअम, लोह,कॉपर , झिंक, थायमिन तसेच राइबोफ्लेविन चे गुणधर्ण असतात. यामुळे त्वचेच्या विकारांपासून संरक्षण होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी कच्ची हळद पाण्यामध्ये उकळून घ्यावी. हे मिश्रणयुक्त पाण्याचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. 

कृती -

१. सुरुवातीला एका भांड्यात दोन ग्लास पाणी घ्यावे, ते पाणी गरम झाले की त्यात साफ  केलेली कच्ची हळद टाकावी. 

२. पातेळ्यात १ ग्लास पाणी शिल्लक राहिल इतके पाणी उकळु द्यावे. त्यानंतर हे  हळदीचे पाणी गाळून घ्यावे. 

३. तज्ञांच्या सल्ल्यानुसार, रोज नियमितपणे हळदीचे पाणी न चुकता प्यावे, तुम्हालाही फरक जाणवेल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स