शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Summer Health tips: उन्हाळ्यात 'हे' फळ म्हणजे हृदय, किडनीसाठी फायदेशीर, आजपासूनच सेवन करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 13:39 IST

शरीराला गंभीर आजारांपासून वाचवण्यास हे फळ उपयोगी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी आहे. खरबूज खाण्याचे फायदे जाणून (Muskmelon Benefits in summer ) घेऊयात.

उन्हाळ्यात (Summer) फळांचा राजा आंब्याची बहुतेक लोक आतुरतेने वाट पाहत असले तरी आरोग्याच्या फायद्यांवर (Health Benefits) नजर टाकली तर खरबूज (Muskmelon) सुद्धा या ऋतूत सुपरफूडपेक्षा कमी नाही. खरबूज उन्हाळ्यात मिळणारे हंगामी फळ आहे, जे प्रत्येकाला खायला आवडते. हे फळ ९७ टक्के पाण्याने भरलेले असते, यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. हेल्थलाइननुसार, खरबूजामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आढळतात. शरीराला गंभीर आजारांपासून वाचवण्यास हे फळ उपयोगी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी आहे. खरबूज खाण्याचे फायदे जाणून (Muskmelon Benefits in summer ) घेऊयात.

प्रतिकारशक्ती वाढतेखरबूजामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. यामुळे आपण संसर्ग आणि रोगापासून वाचू शकतो.

वजन कमीखरबूजामध्ये पाणी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतं. यामुळं शरीर हायड्रेट राहतं आणि आतडे स्वच्छ ठेवण्याचे काम आपोआप होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीरखरबूजात आढळणारा एडेनोसिन नावाचा घटक शरीरातील रक्त पातळ करतो, त्यामुळे रक्त घट्ट होत नाही आणि हृदयविकाराचा धोका टळतो.

बद्धकोष्ठताखरबूजात पाणी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते.

डोळ्यांसाठी फायदेशीरयामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन आढळतात. हे दोन्ही घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

किडनीसाठी फायदेशीरखरबूजात पाणी मुबलक प्रमाणात आढळते आणि ऑक्सिजन मिळतो त्यामुळे किडनीमध्ये मुतखड्याचा त्रास होत नाही आणि ते सहज फ्लश होत राहतं.

मधुमेहामध्ये खरबूज खाखरबूज चवीला गोड असला तरी त्यात साखरेचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेले लोकही ते खाऊ शकतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स