शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Updates: ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यादरम्यान RBI चा सामान्यांना दिलासा, पुन्हा EMI होणार कमी; रेपो दरात कपात
2
२६/११ चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणणार?; दिल्ली-मुंबईत सुरक्षा वाढवली
3
टॅरिफ युद्धात अमेरिका मालामाल, रोज किती होतेय कमाई...? डोनाल्ड ट्रम्प यांनी आकडाच सांगितला, जाणून थक्क व्हाल!
4
किती कमी होऊ शकतो तुमचा EMI? होम लोन घेणाऱ्यांना रिझर्व्ह बँकेकडून मोठं गिफ्ट, रेपो दरात कपात
5
कारवरील नियंत्रण सुटून स्कोर्पिओ तलावात कोसळली; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
6
"रोहित Mumbai Indians चा कॅप्टन नाहीये, हा हार्दिक पांड्याचा संघ आहे, त्यामुळे... - अंबाती रायुडू
7
लाँच झालं नवं Aadhaar app; आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही, काय आहे खास?
8
अजित पवारांनी असल्या माणसाला मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होतं; राजू शेट्टी भडकले
9
तुमची कामे लवकर करून घ्या, 'आपले सरकार' पोर्टल पाच दिवस राहणार बंद, कारण...
10
कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिले?; मुख्यमंत्री कार्यालयाने मागवली माहिती
11
शाहरुख-सलमानच्या घरी आयकर विभागाची धाड पडली तर काय करशील? अजय देवगण म्हणाला....
12
राशीभविष्य, ९ एप्रिल २०२५: आर्थिक लाभ होईल, मान-सन्मान होतील पण हट्टीपणावर संयम ठेवा!
13
ठसकेबाज लावणी करणारी गौतमी पाटील आता महाराष्ट्राला दाखवणार पाककौशल्य, 'या' कार्यक्रमात दिसणार
14
पत्नीसोबत ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; घरबसल्या दरवर्षी मिळतील ₹१,११,०००, रक्कमही राहिल सुरक्षित
15
प्रभादेवी रेल्वे पूल लवकरच पाडणार; वाहतूक मार्गात असा होणार बदल
16
राणी मुखर्जीला बॉलिवूडमध्ये लाँच करणारे प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचं निधन
17
महागाईचा भडका; सीएनजीच्या दरात आजपासून १.५ रुपयांनी वाढ
18
'एस्क्युज मी' बोलू नको, मराठीत बोल म्हणत मारले; डोंबिवली पश्चिमेत वाद: अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
19
महामुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना निधीचे ‘बुस्टर’; MMRDAच्या प्रकल्पांसाठी मिळणार चार लाख कोटींचे कर्ज
20
क्लोजर रिपोर्ट सुनावणी वर्ग करण्यास परवानगी; सुशांतसिंहप्रकरणी सीबीआयने केलेली मागणी

इवलंस दिसणार 'हे' फळ पण फायदे फारच मोठे; किडनी, फुफ्फुस आणि त्वचाविकारांवर रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 15:18 IST

त्यात असलेल्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर, त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, फायबर, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, झिंक, व्हिटॅमिन ए, बी6, सी, ई, के, सोडियम, तांबे इत्यादी घटक भरपूर प्रमाणात असतात. जाणून घेऊया तुती खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे होतात.

तुती हे फळ दिसायला जेवढे सुंदर आहे, तेवढेच आरोग्यदायी आहे. या फळामध्ये अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे शरीराला कित्येक फायदे होतात. उन्हाळ्यात तुती भरपूर खायला हव्यात. चवीला आंबट, गोड तुती उष्माघातापासून आपला बचाव करते. याव्यतिरिक्त रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठीही फायदा होतो. हे फळ त्वचेसोबतच केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात असलेल्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर, त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, फायबर, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, झिंक, व्हिटॅमिन ए, बी6, सी, ई, के, सोडियम, तांबे इत्यादी घटक भरपूर प्रमाणात असतात. जाणून घेऊया तुती खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे होतात.

तुतीचे प्रकारHealthifyMe मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, तुतीचे तीन प्रकार आहेत, पांढरे तुती, लाल तुती आणि काळा तुती. लाल तुतीला अमेरिकन तुती म्हणूनही ओळखले जाते. पांढऱ्या तुतीचे शास्त्रीय नाव मोरस अल्बा आहे, तर लाल तुतीला मोरस रुब्रा म्हणतात. काळ्या तुतीचे वैज्ञानिक नाव मोरस निग्रा आहे. ते मूळतः आशियाई देशांमध्ये, विशेषतः दक्षिण-पश्चिम आशियामध्ये आढळतात.

तुतीचे आरोग्य फायदे

मूत्रपिंडासाठी तुतीचे फायदेकिडनी शरीरातील खराब घटक आणि विषारी द्रव्य काढून टाकण्याचे काम करते. एका अभ्यासानुसार, मधुमेहामुळे किडनी खराब झालेल्या लोकांसाठी तुतीचा अर्क किंवा रस फायदेशीर ठरू शकतो. तुतीचे अर्क इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते, शरीरातील इंफ्लेमेशन उपचार करते.

केसांसाठी तुतीचे फायदेमेलेनिन हे एक नैसर्गिक रंगद्रव्य आहे, ज्यामुळे केसांना चांगला रंग प्राप्त होत असतो. जेव्हा मेलेनिनची शरीरात निर्मिती कमी होते, तेव्हा केस पांढरे होऊ लागतात. संशोधनानुसार, तुती मेलेनिन तयार करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, ती केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठीही फायदेशीर आहे. अवेळी केस पांढरे होऊ नयेत, असे वाटत असेल तर तुती खा. तुतीचा रस प्यायल्याने केसांची वाढही होते. तुम्ही तुतीचा रस थेट केसांना लावू शकता.

त्वचेसाठी तुतीचे फायदेतुतीचा अर्क त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. पिगमेंटेशनचा त्रास कमी होतो. त्वचा टोन राहते, गडद डाग कमी होतात. तुतीमध्ये असलेले घटक सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करतात. तसेच, अँटिऑक्सिडंट्स वृद्धत्वविरोधी म्हणून काम करतात. तुतीमधील व्हिटॅमिन ए, सी, ई सुरकुत्याची समस्या कमी करण्यास मदत करते.

फुफ्फुसासाठी तुतीचे फायदेतुम्हाला फुफ्फुसाचा संसर्ग असेल तर यामध्येही तुती खाणे फायदेशीर ठरते. तुतीच्या झाडाच्या मुळाच्या सालात देखील अँटीव्हायरल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो, त्यामुळे तुती फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स