शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

Weight loss tip: Interval Walking चे आहेत भरपूर फायदे, फॅट्स होतात बर्न, वजन कमी होते झटपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 11:46 IST

इंटरव्हल वॉकिंगमध्ये (Interval Walking) तुम्हाला लवकर-लवकर चालावे लागते जेणेकरून जास्त चरबी जाळली जाऊ शकते आणि वजन झपाट्याने कमी (Weight Loss) होते.

बरेच लोक चालण्याने वजन कमी होत नाही म्हणून वैतागून जातात आणि शेवटी ते चालणे बंद करतात. तुमच्यासोबतही असेच काही घडत असेल तर इंटरव्हल चालणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, इंटरव्हल वॉकिंगमध्ये (Interval Walking) तुम्हाला लवकर-लवकर चालावे लागते जेणेकरून जास्त चरबी जाळली जाऊ शकते आणि वजन झपाट्याने कमी (Weight Loss) होते. या चालण्याच्या दरम्यान शरीराला अनेक ब्रेक दिले जातात आणि प्रत्येक ब्रेकसाठी एक वेळ निश्चित केली जाते.

इंटरव्हल चालण्यामुळे शरीराला जास्त थकवा येत नाही आणि लवकर रिकव्हरही होते. इंटरवलदरम्यान तुम्ही सामान्य श्वासोच्छ्वास करता, ज्यामुळे तुम्हाला तुमचे फिटनेस ध्येय गाठणे सोपे होते. अशा प्रकारे, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर इंटरवल ट्रेनिंग हा (Interval Walking For Weight Loss) सर्वोत्तम मार्ग असू शकतो.

इंटरव्हल चालण्याची पद्धत

पहिली स्टेपयासाठी तुमच्याकडे स्मार्टवॉच किंवा स्टॉप वॉच असेल तर अधिक व्यवस्थित होईल. सर्व प्रथम ५ मिनिटांत वॉर्म अप वॉक करा. या ५ मिनिटात संथ गतीने चाला म्हणजे जास्त थकवा येणार नाही. असे केल्याने शरीर उबदार राहते आणि स्नायूंना पूल होणार नाही. यानंतर, एका मिनिटात सुमारे १०० पावले चालण्याचे ठरवा. यावेळी, खोल खोल श्वास घ्या. तुमचा श्वास सामान्य राहील याकडे लक्ष ठेवा.

दुसरी स्टेपवॉर्म अप केल्यानंतर तुमचा पहिला इंटरवल सुरू करा. जर तुम्ही हे पहिल्यांदा करत असाल तर ३० सेकंदांचा गॅप ठेवा. या दरम्यान चालताना छोटी पावले टाका आणि पूर्ण जोर देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आपले हात पुढे आणि मागे जोरदारपणे हलवा. इथे तुमचा श्वास थोडा लहान होऊ लागेल. 30 सेकंदांनंतर, सामान्य चालण्याकडे परत या आणि २.३० मिनिटे तसेच चालणे ठेवा. त्याचप्रमाणे ५ पूर्ण इंटरवल करा आणि जेव्हा हा वर्क आऊट पूर्ण होईल, तेव्हा शेवटी 5 मिनिटांच्या कूल डाउनेच पूर्ण करा.

तिसरी स्टेपअशाप्रकारे, जर तुम्ही अर्ध्या तासाच्या वर्कआउटचे नियोजन करत असाल, तर सुरुवातीला ५ मिनिटे लाइट वॉर्म अप, ५ व्या ते ७ व्या मिनिटाला जलद चालणे, ७ व्या ते ८ व्या मिनिटाला लाइट वॉक, ८ते ​​१०व्या मिनिटाला शक्य तितक्या वेगाने चालणे. नंतर १० व्या ते ११ व्या मिनिटापर्यंत हळू चालत जा. त्यानंतर, ११ ते १३ व्या मिनिटापर्यंत वेगाने चालत जा. त्यानंतर १३-१४व्या मिनिटाला हलके चालावे. १५ मिनिटांनंतर, ते आणखी हलके. मग हळूहळू चालणे वाढवा. २५ व्या ते ३० व्या मिनिटात, अतिशय हलके चालताना हळू हळू थांबा. अशा प्रकारे, तुम्ही अर्धा तास वेगाने आणि हळू चालत रहा.

इंटरवल वॉकिंग अ‌ॅडवान्स लेवलवर नेण्यासाठी टिप्स

- विश्रांतीची वेळ कमी करा.

- डोंगराळ किंवा उंच भागात चाला.

- तुमचा वेग वाढवा.

- बराच वेळ चाला.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स