शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

स्वयंपाकघरातील 'हा' मसाला जेवणाची लज्जत वाढवतो, पण याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 17:55 IST

रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि हृदयविकार टाळण्यास देखील दालचिनी खूप उपयुक्त आहे. इतकेच नाही तर त्यात असे अनेक गुणधर्म आहेत जे कर्करोग, एचआयव्ही, बुरशीजन्य संसर्ग, न्यूरोलॉजिकल रोग इत्यादी आरोग्य समस्यांपासून आपले संरक्षण करू (Health Benefits Of Cinnamon) शकतात.

साधारणपणे आपण जेवणाची चव वाढवण्यासाठी दालचिनीचा वापर करतो. अनेक वर्षांपासून याचा वापर आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठीही केला जात आहे. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि या कारणास्तव तिला सुपर फूडचा दर्जा दिला गेला आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी आणि हृदयविकार टाळण्यास देखील दालचिनी खूप उपयुक्त आहे. इतकेच नाही तर त्यात असे अनेक गुणधर्म आहेत जे कर्करोग, एचआयव्ही, बुरशीजन्य संसर्ग, न्यूरोलॉजिकल रोग इत्यादी आरोग्य समस्यांपासून आपले संरक्षण करू (Health Benefits Of Cinnamon) शकतात.

दालचिनीचे फायदे -अँटिऑक्सिडंट्सने समृद्धदालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. आपल्याला अनेक आजारांपासून ते वाचवतात. एवढेच नाही तर फ्री रॅडिकल्सपासूनही आपले संरक्षण करण्यासाठी दालचिनी उपयोगी आहे.

सूज कमी होते -दालचिनीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात, शरीराच्या ऊतींमध्ये कुठेही जळजळ कमी करण्यास आणि बरे करण्यास त्यामुळे मदत होते.

हृदय निरोगी -दालचिनीचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोका कमी होतो. हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर असे जीवघेणे आजार होण्याची शक्यता कमी होते.

मधुमेह विरोधी गुणधर्म -रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी दालचिनी खूप उपयुक्त आहे, ज्यामुळे मधुमेहाची समस्या नियंत्रणात राहते.

मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर -एखाद्या व्यक्तीने आपल्या दिनचर्येत दालचिनीचा समावेश केला तर अल्झायमर, पार्किन्सन्स अशा अनेक मानसिक समस्या नियंत्रणात राहतात.

कर्करोग -संशोधनात असे आढळून आले आहे की, दालचिनी कर्करोगापासून बचाव आणि उपचारादरम्यान खूप फायदेशीर ठरते.

घसा खवखवणे -चिमूटभर दालचिनी पावडर आणि चिमूटभर काळी मिरी कोमट पाण्यात मध मिसळून घेतल्याने घसादुखी आणि सर्दी कमी होते.

लठ्ठपणासाठी -दालचिनी चयापचय वाढवते. ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे, त्यांनी दालचिनीचा आहारात समावेश केल्यास लठ्ठपणाची समस्याही कमी होते.

बुरशीजन्य संसर्गापासून संरक्षण -दालचिनीमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. संक्रमणापासून संरक्षण करण्यास आपल्याला मदत होते. अशा प्रकारे दालचिनीचा आहारात समावेश करून आपण अनेक फायदे मिळवू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स