शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रोज पायऱ्या चढण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वजन झटपट कमी होतेच पण, 'हे' आजारा राहतात दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 16:53 IST

पायऱ्या चढण्या-उतरण्यासारख्या साध्या कृतीनेही आपण वजन कमी करू शकता. हा व्यायाम नियमितपणे केल्यास वजन कमी करण्यासाठीचा उत्तम व्यायाम आहे.

आपल्याला वाटते की वजन कमी करायचे असेल तर जिमलाच जावे लागते, त्याशिवाय आपले वजन कमी होणार नाही. पण असे नाही. पायऱ्या चढण्या-उतरण्यासारख्या साध्या कृतीनेही आपण वजन कमी करू शकता. हा व्यायाम नियमितपणे केल्यास वजन कमी करण्यासाठीचा उत्तम व्यायाम आहे. तुम्ही कामावरून घरी आल्यावर लिफ्टचा उपयोग करण्याऐवजी पायऱ्यांचा उपयोग करत चढत घरी या. यामुळे तुमचे वजन झटपट कमी होईल.

जिन्याच्या पायऱ्या चढल्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याशी संबधित आजारांपासून सुटका मिळू शकते. तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी हा अत्यंत योग्य व्यायाम आहे. तणाव व अन्य चिंता दूर करण्यासाठीही हा व्यायाम अत्यंत फायदेशीर आहे. संधिवाताच्या (arthritis)च्या रुग्णांनी मात्र हा व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बॅलन्स आणि स्टॅमिना वाढतोफिटनेस एक्सपर्टच्या मते पायऱ्या चढल्याने तुमच्या पायांची आणि टाचांचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे तुम्ही शरीराचा तोल व्यवस्थित सांभाळू शकता. यामुळे तुमच्या शरीरात संतुलन राहिलं आणि सहनशक्तीही वाढेल. सुुरुवातीला पायऱ्या चढताना तुम्हाला त्रास होईल पण हळूहळू सरावाने जमेल.

मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तमतज्ज्ञांच्या मदते पायऱ्या चढल्याने तुम्हाला मुड-बुस्टिंग एनर्जी मिळेते. यामुळे कॅलरी बर्न होतात व शरीरात रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते. यामुळे मानसिक ताणतणावही दूर राहतात.

उत्तम व्यायामस्नायु बळकट करण्याव्यतिरिक्त क्वाड्रिसेप्स, ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग आदीही उत्तम बनवण्यासाठी अशाप्रकारच्या व्यायामाचा फायदा होतो. पायऱ्या चढल्याने, चालण्याने व जॉगिंग केल्याने आपले स्नायू अधिक मजबूत होतात.

वजन कमी होतेतुमचे वजन कमी करण्यासाठी हा उत्तम व्यायाम आहे. तुम्ही जिन्याच्या पायऱ्या चढण्याची सवय लावून घेतली तर तुमचे वजन हळूहळू कमी होईल. यासाठी तुम्ही कार्डिओ करत आहात अशा पद्धतीने पायऱ्या चढा. मात्र ध्यानात ठेवा एकाच वेळी भरपूर पायऱ्या चढू नका. याची हळू हळू सवय लावा जेणेकरून तुम्ही कमी थकाल.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स