शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बदाम दुधाचे असेही फायदे जे वाचून व्हाल चकित, 'या' रुग्णांसाठी रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 19:34 IST

तुम्ही बदामाचे दूध तयार करून त्याचे सेवन करू शकता. जर तुम्ही नियमित बदाम किंवा बदामाचे दूध घेतले तर ते तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

बदाम हा असा सुका मेवा आहे ज्यातील फॅट सर्वात कमी असते. बदामामध्ये प्रथिने अधिक असतात त्याच्या सेवनाने समरणशक्ती वाढते. बदामाच्या दुधाचा फायदा डोळ्यांनाही होतो. त्यामुळे बदामाचे सेवन आपल्या रोजच्या आहारात घेणे महत्वाचे आहे. तुम्ही बदामाचे दूध तयार करून त्याचे सेवन करू शकता. जर तुम्ही नियमित बदाम किंवा बदामाचे दूध घेतले तर ते तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल, कारण बदामामध्ये कॅल्शियम, मॅगनेशियम, मॅंगेनिज, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई हे घटक असून ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त मानले जातात. डाएट एक्सपर्ट डॉ रंजना सिंह यांनी झी न्युजला सांगितल्यानुसार बदाम दूध पिण्याचे फायदे काय आहेत ते पाहा?

बदामाचे दुध तयार करण्याची पद्धतबदाम आठ ते दहा तास अथवा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी त्याचे साल काढून सोलून घ्या. सोललेले बदाम स्वच्छ धुवून घ्या. ब्लेंडर अथवा मिक्सरमध्ये बदाम आणि त्याच्या चार पट पाणी घालून एक छान स्मूदी तयार करा. एका गाळणीच्या साहाय्याने  हे दूध गाळून घ्या आणि वापरा.

मधुमेह असणाऱ्यांनी करा बदामाच्या दुधाचे सेवनजर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर तुम्ही रोजच्या दुधापेक्षा बदामाच्या दुधाचे सेवन करा. बदामाच्या दुधात साखरेचं प्रमाण कमी असते आणि फायबर अधिक असते.

व्हिटॅमिन डीनं समृद्धआपल्या शरीराला व्हिटॅमिन डी ची सर्वात जास्त गरज असतेआणि सूर्यप्रकाश हा त्याचा सर्वात मोठा स्रोत आहे. याने आपल्या हृदयाचे कार्य, हाडांची मजबुती आणि रोग प्रतिकार वाढते.  प्रत्येकाने रोज एक कप बदामाचे दूध घेतल्यास व्हिटॅमिन डीची कमतरता भासणार नाही.वजन कमी करण्यास होते मदतकाही तज्ज्ञांच्या मते बदामाच्या दुधामध्ये कमी कॅलरीज असतात बदामाच्या दुधात ८० टक्के कमी कॅलरीज असतात. त्यामुळे आपल्या शरीरात फॅट्स तयार होत नाही. त्यामुळे वजन नियंत्रित राहते. फॅट्सयुक्त पदार्थ खाणाऱ्यांसाठी बदामाचे दूध उत्तम आहे.

व्हिटॅमिन ई ने समृद्धदररोज सकाळी आपल्या ब्रेकफास्टमध्ये बदामाच्या दुधाचे सेवन करा. त्यामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन ई मिळते. आपले शरीर दररोज २० ते ५० टक्के व्हिटॅमिन इ खर्च करते. बदामाचे दुध उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते आणि यामुळे तणाव,जळजळ इत्यादींपासून मुक्ती देते.

कॅल्शियमने परिपूर्ण बदामाचे दूधजर आपण दररोज एक कप बदाम दूध घेतले तर ते आपल्या शरीराला लागणारं २० ते ४५ टक्के कॅल्शियम दिवसाला पुरवते. तसेच यामुळे आपले हृदय, हाडे, मज्जातंतू हे चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करतात.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स