शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही दिवसातून किती वेळ खावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 15:13 IST

Belly Fat : The American Dietetic Association यांच्यानुसारही पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पोटवरील चरबी कमी करण्याच्या दृष्टीने दिवसातून किती वेळा दही खावे. 

Belly Fat : लठ्ठपणाचे शिकार झालेल्या लोकांमध्ये जास्त त्रास होतो तो पोटावरील चरबीचा. एक्सपर्ट्सही हे मानतात की, वजन कमी करण्यासाठी बेली फॅट म्हणजेट पोटावरील चरबी कमी करणं सर्वात कठीण असतं. एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय आणि The American Dietetic Association यांच्यानुसारही पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पोटवरील चरबी कमी करण्याच्या दृष्टीने दिवसातून किती वेळा दही खावे. 

डाएट एक्सपर्ट्स असं मानतात की, २४ तासातून तुम्ही जर ३ वेळा दह्याचं सेवन केलं तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होण्यापासून वाचू शकता. पोटावर चरबी आल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. जर तुम्हालाही पोटावर चरबी वाढल्याची समस्या झाली असेल तर दही खाण्याचे फायदे जाणून घेतले पाहिजे.  

बेली फॅट का आहे घातक?

कंबरेच्या आजूबाजूला चरबी होण्याला बेली फॅट म्हटलं जातं. डॉक्टर्सही सांगतात की, पोटावर चरबी वाढल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. स्ट्रोक आणि हृदय रोगाचा धोकाही अधिक असतो. त्यासोबतच पोटावर चरबी वाढल्याने शरीरात अनेक बदलही होतात. जसे की, मेटाबॉलिक रेट कमी होतो. कोर्टिसोल हार्मोनची निर्मिती वाढते. आणि हे कोर्टिसोल हार्मोन स्ट्रेस वाढवण्याचं काम करतात.

तसेच पोटावर चरबी अधिक असल्याने सायटोकिनचं प्रमाणही वाढतं, ज्याने शरीरातील इन्फ्लेमेटरीचं प्रमाण वाढतं. यामुळेच शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि डायबिटीसचा धोका अनेक पटीने वाढतो. म्हणजे सर्व गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत.

कोणत्या आजारांचा धोका?

पोट आणि कंबरेवर चरबी वाढल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो. त्यात प्रामुख्याने हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, कोलेस्ट्रॉलची समस्या, हार्ट स्ट्रोक, डिमेंशिया, किडनीची समस्या आणि कॅन्सरचाही धोका वाढतो.

दही खाण्याचे फायदे

दही हे एक प्रोबायोटिक आहे. आतड्यांमध्ये हेल्दी बॅक्टेरिया वाढवण्यासाठी दह्याचं सेवन फायदेशीर ठरतं. त्यामुळेच दह्याचं सेवन केल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि पचनक्रियाही सुधारते. असं असलं तरी दह्यात फॅटचं प्रमाण कमी असलं पाहिजे, याची काळजी घ्यावी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य