शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सतत तहान लागत राहणे नाही सामान्य, असू शकतं अनेक गंभीर आजारांचं लक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 17:50 IST

दिवसभरात दर तीन ते चार तासांनी पाणी पिणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे; पण दर अर्ध्या किंवा एक तासानंतर तहान लागत असेल आणि पाणी पिण्याची इच्छा होत असेल तर ही बाब चिंताजनक ठरू शकते. कारण प्रमाणापेक्षा जास्त तहान लागणं (Excessive Thirst) हे एखाद्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.

जीवनशैलीत बदल झाल्याने हृदयविकार (Heart Disease), डायबेटीससारखे (Diabetes) गंभीर आजार जडण्याचं प्रमाण वाढलं आहे. आजार (Disease) कोणताही असला तरी त्याची पूर्वलक्षणं (Symptoms) शरीरात दिसू लागतात. त्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं आणि वैद्यकीय सल्ला घेतला, तर आजार नियंत्रणात राहतात.

दिवसभरात दर तीन ते चार तासांनी पाणी पिणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे; पण दर अर्ध्या किंवा एक तासानंतर तहान लागत असेल आणि पाणी पिण्याची इच्छा होत असेल तर ही बाब चिंताजनक ठरू शकते. कारण प्रमाणापेक्षा जास्त तहान लागणं (Excessive Thirst) हे एखाद्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. अशा वेळी संबंधित व्यक्तीने याकडे दुर्लक्ष न करता तातडीनं वैद्यकीय तपासणी, उपचार सुरू करणं गरजेचं आहे. डायबेटीस, डिहायड्रेशन, अ‍ॅनिमिया यांसारख्या आजारांमध्ये सर्वसामान्यपणे हे लक्षण दिसतं. त्यामुळे निदान करून घेणं गरजेचं आहे. `एनडीटीव्ही`नं याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

डायबेटीस, ड्राय माउथ, अ‍ॅनेमिया यांसारख्या आजारांची काही पूर्वलक्षणं शरीरात दिसतात. त्यामध्ये तहान लागणं, सातत्यानं पाणी पिण्याची इच्छा होणं या लक्षणाचा समावेश असतो. शरीरातल्या लाल पेशींची संख्या कमी झाली तर अ‍ॅनिमिया (Anemia) नावाचा आजार होतो. सामान्य भाषेत याला रक्ताची कमतरता असं म्हणतात. अ‍ॅनिमिया झाल्यास लगेच प्रमाणापेक्षा जास्त तहान लागत नाही; पण आजार गंभीर बनला तर हळूहळू तहान लागण्याचं प्रमाण वाढू शकतं.

डायबेटीस हेदेखील सतत तहान लागण्याचं कारण असू शकतं. डायबेटीसमुळे प्रमाणापेक्षा जास्त तहान लागते. डायबेटीसचे असे दोन ते तीन प्रकार आहेत, ज्यामध्ये शरीर फ्लुइड्सचं (Fluids) योग्य पद्धतीनं नियमन करू शकत नाही. अशा स्थितीत शरीरातलं पाणी कमी होतं. अशा स्थितीत तपासणी केली असता डायबेटीसचं निदान होतं.

डिहायड्रेशनकडे आजार म्हणून नाही तर आरोग्यविषयीची एक समस्या म्हणून पाहिलं जातं. शरीरात पाणी किंवा द्रव पदार्थाची कमतरता निर्माण झाली तर डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन (Dehydration) झाल्यावर चक्कर येणं, उलट्या होणं, डोकेदुखी किंवा जुलाब होणं या समस्या निर्माण होतात.

ड्राय माउथ (Dry Mouth) अर्थात तोंडाला कोरड पडणं ही एक प्रकारची समस्या आहे, ज्यामुळे सारखं पाणी पिण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. तोंडाला कोरड पडणं हे एखाद्या आजाराचं लक्षण असू शकतं. तोंडातल्या ग्रंथी लाळेची निर्मिती योग्य पद्धतीने करत नसतील तर ही समस्या निर्माण होते. यामुळे तोंडाला दुर्गंधी येणं, हिरड्यांना संसर्ग होणं आणि ओठ दातांना चिकटणं आदी समस्या निर्माण होऊ शकतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स