शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! ही सहज दिसणारी लक्षण ठरू शकतात हृदयासाठी घातक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 18:46 IST

आपल्याला असे वाटते छातीत दुखणे म्हणजे हृदयरोगाचे पहिले लक्षण आहे पण, आपले शरीर या आधीच आपल्याला काही सिग्नल्स देते. त्याकडे वेळीच लक्ष देऊन डॉक्टरांकडे जाऊन उपचार करुन घेणं फायदेशीर आहे.

हृदयरोगाची अशी अनेक लक्षणं आहेत जी आपल्याला लगेच कळत नाहीत पण ती फार धोकादायक ठरु शकतात. आपल्याला असे वाटते छातीत दुखणे म्हणजे हृदयरोगाचे पहिले लक्षण आहे पण, आपले शरीर या आधीच आपल्याला काही सिग्नल्स देते. त्याकडे वेळीच लक्ष देऊन डॉक्टरांकडे जाऊन उपचार करुन घेणं फायदेशीर आहे. जर खाली दिलेल्या लक्षणांपैकी काही लक्षणे आपल्याला जाणवली तर डॉक्टरांकडे लगेच धाव घ्या. कार्डिओलॉजिस्ट डॉ. अभिषेक शुक्ला यांनी या लक्षणांबातची माहिती. ओन्ली माय हेल्थ शी बोलताना दिली.

व्यायाम किंवा मॉर्निंगवॉक करताना छातीत दुखणंव्यायाम किंवा वॉक करताना आपल्याला दमायला होतं. श्वासोच्छवासाचा वेग वाढतो. तुम्हाला वाटत असेल की हे व्यायाम केल्यामुळे होत आहे, पण हा तुमचा गैरसमज ठरू शकतो. समजा धावताना किंवा व्यायाम करताना तुमच्या छातीत दुखू लागले आणि तुम्हाला थकल्यासारखे वाटू लागले तर निश्चितच याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे दुखणं जर बराचवेळ तसंच राहिलं तर डॉक्टरचा योग्य सल्ला घ्या.

हार्ट पल्पटेशनतुम्हाला हार्ट पल्पटेशनची समस्या जाणवत असेल तर वेळ न दवडता डॉक्टरकडे जा. हार्ट पल्पटेशन म्हणजे अचानक तुमचे हृदयाचे ठोके वाढतात. तसेच हे कधीही मध्येच जाणवते. असं असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य.

घशाचे किंवा जबड्याचे दुखणेघशाचे किंवा जबड्याच्या दुखण्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. जर तुम्हाला छातीच्या दुखण्याबरोबरच जबडा आणि घशाचेही दुखणे असेल तर हे हृदयविकाराचे एक लक्षण असू शकते. श्वासोच्छवास वाढणे, अनियमत हृदयाचे ठोके वाढणे तसेच घशाचे आणि जबड्याचे दुखणे ही हृदयविकाराची काही सामान्य लक्षणे आहेत.

श्वास घेताना त्रास होणेतुम्हाला रोजचा दिनक्रम पार पाडताना त्रास होत असेल तर वेळीच लक्ष द्या. पायऱ्या चढताना त्रास होत असेल, श्वास घेताना त्रास होत असेल तर हे वजन वाढल्यामुळे आहे असे अजिबात समजू नका. हे हृदयरोगाचे लक्षण असू शकते. 

सूजसमजा तुम्हाला पाय किंवा शरीरातील इतरही कोणत्या भागात सुज असेल तर वेळीच सावधान व्हा! बरेचदा हृदयविकार असणाऱ्या रुग्णांमध्ये पायावर किंवा शरीरातील अन्य भागांवर सुज येते. त्यामुळे त्वरित डॉक्टरकडे जा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स