शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जेवल्यावर आंघोळ करणं पडू शकतं महागात, आयुर्वेदात सांगितलं आहे याचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 11:18 IST

Bathing After Meal : बरेच लोक दुपारी किंवा रात्री जेवण झाल्यावर आंघोळ करतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, असं करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. 

Bathing After Meal : जीवन जगत असताना अनेक दैनंदिन गोष्टींचा आपल्या आयुष्यात महत्वाचा सहभाग असतो. सकाळी उठून आंघोळ करणे, नाश्ता करणे, दुपारी जेवण करणे, सायंकाळी पुन्हा नाश्ता आणि मग नंतर रात्रीचं जेवण. पण ही सायकल सगळ्यांना शक्य होत नाही. कारण धावपळीचं जीवन. बरेच लोक दुपारी किंवा रात्री जेवण झाल्यावर आंघोळ करतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, असं करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. 

रोजच्या जगण्यात फक्त चांगला आहार घेणं इतकंच महत्वाचं नाही तर आहाराची पद्धतही महत्वाची असते. बरेच लोक जेवण केल्यावर आंघोळ करतात. पण असं करणं योग्य असतं का? चला याबाबत आयुर्वेदात आणि मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये काय सांगितलं आहे ते जाणून घेऊ.

आयुर्वेदात काय सांगितलं?

सध्याच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांचाच टाईमटेबल बिघडला आहे. त्यामुळे वेळी-अवेळी लोक आंघोळ करतात. आयुर्वेदात याबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहे. आयुर्वेद भारतातील फार जुनी चिकित्सा पद्धती आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येक काम करण्यासाठी एक ठराविक वेळ असतो आणि यात बदल केल्याने शरीराचं नुकसान होऊ शकतं. जर जेवण केल्यानंतर आंघोळ केली तर याबाबत म्हटलं जातं की, जेवण केल्यावर २ तासांपर्यंत आंघोळ करू नये.

अन्न पचवण्यासाठी शरीराचं फायर एलिमेंट जबाबदार असतं, जसेही तुम्ही जेवण करता तेव्हा फायर एलिमेंट अ‍ॅक्टिव होतं. ज्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. हे पचनक्रियेसाठी चांगलं असतं. पण जर तुम्ही जेवण केल्यावर आंघोळ केली तर शरीराचं तापमान कमी होतं, ज्यामुळे पचनक्रिया हळुवार होते.

मॉडर्न सायन्स काय सांगतं?

मॉडर्न मेडिकल सायन्स सांगतं की, आंघोळ केल्याने शरीराचं तापमान कमी होतं आणि ब्लड सर्कुलेशन डायव्हर्ट होतं. याचा परिणाम असा होतो की, जे रक्त डायडेशनमध्ये मदत करणार असतं, ते त्वचेकडे तापमान मेंटेन करण्यासाठी फ्लो होऊ लागतं.

एक्सपर्ट्स काय सांगतात?

एका एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, जेवण केल्यावर आंघोळ केल्याने वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. याने अ‍ॅसिडीटी, उलटी आणि इतकेच काय तर लठ्ठपणाही वाढू शकतो. निसर्गानुसार, व्यक्तीने जेवणाआधी आंघोळ केली पाहिजे. कारण जेव्हा आपण आंघोळ करतो, तेव्हा प्रत्येक पेशी री-एनर्जाइज्ड होतात आणि आपल्याला ताजंतवाणं वाटतं. याने आपल्या शरीराला भूक लागल्याने सिग्नल मिळतात. एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर साधारण १ तासानंतर आंघोळ करावी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य