शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

तुळशीच्या पानांचा 'अशाप्रकारे' केला उपयोग तर ठरेल किडनी स्टोनवर अत्यंत फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 17:59 IST

किडनी स्टोन दूर करण्यासाठी तुळशीचा रस सर्वात फायदेशीर आहे.

जेव्हा किडनीमध्ये मिनरल्स आणि सॉलचा कठीण भाग जमा होऊ लागतो. तेव्हा किडनीमध्ये स्टोनची समस्या उद्भवते. ते अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे पोटात असह्य वेदना होतात. चुकीच्या खाण्याच्या सवयी, वाढते वजन आणि काही वैद्यकीय परिस्थिती याला कारणीभूत आहेत. किडनी स्टोनमुळे मूत्राशयात अनेक प्रकारचे त्रास होतात.

किडनी स्टोनच्या त्रासावर योग्य वेळी उपचार न केल्यास त्याचा परिणाम शरीराच्या इतर अनेक भागांवर होऊ लागतो. किडनी स्टोन काढण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती उपाय केले जातात. त्याचे फायदेही आहेत. राजमा, लिंबाचा रस, अप्पल सायडर व्हिनेगर, डाळिंबाचा रस इत्यादींनी यावर मात करता येते. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, किडनी स्टोन दूर करण्यासाठी तुळशीचा रस सर्वात फायदेशीर आहे.

TataHealth नुसार, वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तुळशीच्या पानांमध्ये आढळणारी काही संयुगे शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी स्थिर करू शकतात. युरिक ऍसिडमुळे किडनी स्टोन वाढते. याशिवाय तुळशीच्या पानातील अॅसिटिक अॅसिड स्टोन विरघळण्यास मदत करते.

किडनी स्टोनसाठी असा करा तुळशीच्या पानांचा वापर- जर तुम्हाला मुतखडा असेल तर तुम्ही दररोज एक चमचा तुळशीच्या पानांचा रस घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या सॅलडमध्ये तुळशीची काही कच्ची पाने देखील टाकू शकता.

- किडनी स्टोन दूर करण्यासाठी रोज तुळशीची पाने मिसळून चहा बनवा. ताजी किंवा वाळलेली तुळशीची पाने वापरून चहा बनवा आणि दररोज प्या.

- तुळशीच्या पानांचा रसदेखील तुम्ही घेऊ शकता. यासाठी तुळशीची ताजी पानं स्वच्छ करून ज्युसरमध्ये टाकून बारीक करून घ्या. त्यानंतर तुम्ही ते स्मूदीप्रमाणे वापरू शकता. मात्र दररोज फक्त एक किंवा दोन चमचे याचे सेवन करा.

तुळशीच्या पानांचे इतर फायदेआरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी तुळशीमध्ये अनेक गुणधर्म आहेत. भारतात शतकानुशतके तुळशीची पूजा केली जाते. पारंपारिकपणे, तुळशीचा उपयोग जखमा, जळजळ, सर्दी, खोकला बरे करण्यासाठी आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. पण त्यामुळे किडनी स्टोनही दूर होऊ शकतो. तुळशीच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात. त्यामुळे ते किडनीचे आरोग्य राखू शकते. मात्र, इतर भारतीय औषधांप्रमाणे तुळशीवर संशोधन कमी आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स