शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांसाठी सरकारकडून 'इम्युनिटी बुस्टर किट', फ्री वाटप होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 12:08 IST

कोरोना व्हायरसची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची असल्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. यासाठीच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने १६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी प्रतिकारशक्ती वाढवणारं 'बाल रक्षा किट' विकसित केलं आहे.

कोरोना व्हायरसची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची असल्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. यासाठीच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने १६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी प्रतिकारशक्ती वाढवणारं 'बाल रक्षा किट' विकसित केलं आहे. AIIA आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे किट कोरोना संसर्गाशी लढण्यास आणि मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करेल.

काय आहे या किटमध्ये?आयुष मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, किटमध्ये अनु तेल, सीतोपलादी आणि च्यवनप्राश आहे. याशिवाय तुळस, गिलोय, दालचिनी, मद्य आणि वाळलेल्या द्राक्षांपासून बनवलेलं सिरप, ज्यात आश्चर्यकारक औषधी गुणधर्म आहेत.

या पदार्थांच्या नियमित सेवनाने मुलांची प्रतिकारशक्ती वाढते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे किट आयुष मंत्रालयाच्या कडक मार्गदर्शक तत्त्वांनुसार बनवण्यात आलं आहे. हे उत्तराखंडमधील स्थित प्लांटमध्ये भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या इंडियन मेडिसीन्स फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड (IMPCL) द्वारे तयार केलं गेलं आहे.

१० हजार किट फ्रीमध्ये वाटणार२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त अखिल भारतीय आयुर्वेद संस्था १० हजार किटचं मोफत वाटप करणार आहे. भारतात अद्याप मुलांसाठी कोविडची लस उपलब्ध नाही, त्यामुळे मुलांचे आरोग्य लक्षात ठेवून बाल संरक्षण किट महत्त्वाची ठरू शकते.

एआयआयएच्या संचालिका डॉ. तनुजा नेसरी म्हणाल्या की, मुलांना अनेकदा काढे आणि गोळ्या घेण्यात अडचण येते. हा काढे कडू असल्याने मुलांना घेणं कठीण आहे. त्यामुळे असे काढ्याचं सिरप तयार करण्यात आलं आहे. ज्यात सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी इतर काही औषधंही मिसळण्यात आली आहेत.

लहान मुलांना द्यावं 'स्वर्ण प्राशन'डॉ नेसरी म्हणाले, 'राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त ५ हजार मुलांना सुवर्ण प्राशन किटसह दिले जाईल. यासाठी आम्ही दिल्लीच्या शाळांशी आधीच संपर्क साधला आहे. ते म्हणाले की, सुवर्ण प्राशन मुलांचं एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करते. AIIA ने 'स्वास्थ रक्षा किट', 'आरोग्य रक्षा किट' आणि 'आयु रक्षा किट' तयार केलं आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स