शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'या' आर्युवेदिक उपायांनी नियंत्रित करता येऊ शकतो दमा, जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 18:11 IST

आयुर्वेदिक उपायांनी दमा नियंत्रित ठेवता येऊ शकतो.

दम्याच्या आजारावर कोणताही ठोस इलाज नाही आणि सामान्यतः लक्षणांवर आधारित उपचार केले जातात. आयुर्वेद डॉक्टर दम्याच्या उपचारांसाठी अनेक औषधी वनस्पती वापरतात, ज्यात हिस्टामाइन, ब्रोन्कोडायलेटिंग आणि दमाविरोधी गुणधर्म असल्याचा दावा केला जातो. दम्याच्या लक्षणांबद्दल बोलायचे झाल्यास रुग्णाला श्वासोच्छवासाचा त्रास, छातीत घट्टपणा किंवा दुखणे, श्वास सोडताना घरघर येणे. याशिवाय श्वासोच्छवास किंवा खोकल्यामुळेही रुग्णाला झोपेचा त्रास होतो. वेगवेगळ्या लोकांमध्ये त्याची लक्षणे वेगवेगळी (Lungs care tips) असू शकतात.

HealthSite.com मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, आयुर्वेदात असंतुलित कफ, वात आणि पित्त दोषांना दम्याचे कारण सांगितले आहे. ज्यामुळे कोरडा खोकला, कोरडी त्वचा, चिडचिड, ताप, चिंता आणि बद्धकोष्ठता येते. दम्यासाठी आयुर्वेदिक उपचार हा देखील एक चांगला पर्याय आहे. वेद क्योरचे संस्थापक आणि संचालक डॉ. विकास चावला यांच्या मते, आयुर्वेदिक उपायांनी दमा नियंत्रित ठेवता येऊ शकतो.

हर्बल टीअस्थमाचे रुग्ण त्यांची लक्षणे कमी करण्यासाठी विविध औषधी वनस्पतींपासून बनवलेला हर्बल चहा नियमितपणे पिऊ शकतात. डॉ. चावला यांच्या मते, आलं, ओवा, तुळस आणि काळी मिरी यांच्या मिश्रणातून बनवलेला हर्बल चहा अस्थमाच्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो, कारण तो कफ दूर करण्यात फायदेशीर आहे.

मध आणि कांदादम्याचा झटका आल्यास श्वासोच्छवास नीट करण्यासाठी, एका ग्लासमध्ये थोडी काळी मिरी, सुमारे 1 चमचे मध आणि थोडा कांद्याचा रस मिसळा आणि हळूहळू पाजा. परिस्थिती फार बिघडण्यापूर्वी आपण नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकतो.

मोहरीच्या तेलाने मालिश -दम्याच्या रुग्णाच्या छातीवर मोहरीचे तेल कोमट करून त्याची मालिश केल्यास आराम मिळतो. मसाज केल्याने फुफ्फुसांना ऊब मिळते, ज्यामुळे छातीत जमा झालेला कफ निघून जातो आणि श्वास घेणे सोपे होते.

हळद -कर्क्युमिन हा हळदीमध्ये आढळणारा सर्वात शक्तिशाली घटक आहे आणि त्यामुळे हळदीचा रंग पिवळा असतो. हळदीमध्ये काही औषधी आणि अँटिऑक्सिडंट घटक असतात, त्यामध्ये जळजळ रोखण्याची क्षमता असते. दम्यासाठी हे गुणकारी आहे. यासाठी दुधात हळद, हळदीचे पाणी किंवा चहा पिऊ शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स