Health Tips : आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, लसणाला आयुर्वेदात सगळ्यात शक्तीशाली जडी-बुडींपैकी एक मानलं जातं. लसणाच्या मदतीने आरोग्यासाठी अनेक समस्या दूर करता येतात. बरेच लोक आजही कोलेस्ट्रॉल आणि हृदय रोगासाठी लसणाचा वापर करतात. लसणाच्या सेवनाने तसे तर अनेक फायदे होतात. मात्र, जर तुम्ही याचा योग्य वापर शिकले तर तुम्हाला अधिक जास्त फायदा होऊ शकतो.
आयुर्वेद डॉक्टर चैताली राठोड यांनी सांगितलं की, बऱ्याच लोकांना लसणाचा योग्य कसा करायचा हे माहीत नसतं. डॉक्टरांनी सांगितलं की, लसूण कधी अख्खा गिळायचा नसतो किंवा भाजीतही तो अख्खा टाकू नये. डॉक्टरांनी लसणाचा योग्य वापर कसा करायचा हे सांगितलं आहे.
आयुर्वेदात लसण खाण्याची योग्य पद्धत
डॉक्टरांनी सांगितलं की, लसण कधीच अख्खा खाऊ नये किंवा गिळू नये. याच्या वापराची योग्य पद्धत याला बारीक करून किंवा कापून खाण्यात आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे यात आढळणारं तत्व एलिसिन आहे. ज्याला बारीक केल्यावरच याची शक्ती वाढते.
कोलेस्ट्रॉल-कॅन्सर होईल दूर
एलिसिन लसणाची सगळ्यात मोठी ताकद आहे. ज्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, हृदय निरोगी ठेवण्यास, कॅन्सरच्या कोशिकांसोबत लढण्यास, केस चांगले ठेवण्यात, हाय ब्लड प्रेशर मॅनेज करण्यास मदत मिळते.
एलिन ताज्या लसणामध्ये आढळणारं एक रसायन असतं आणि एलिसिनचं एक रूप आहे. लसूण कापल्याने किंवा बारीक केल्याने एलिन नावाचं एंजाइम सक्रिय होतं.
आयुर्वेदात लसणाला रसोना किंवा लगुना म्हटलं जातं. जे एक महाऔषध मानलं जातं. याचे आरोग्याला होणारे फायदे बोटांवर मोजता येत नाहीत. शरीरातील अनेक समस्या लसणाच्या मदतीने दूर होऊ शकतात.