शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गॅस, अ‍ॅसिडिटी, पोटदुखी यावर बेस्ट उपाय आहे कडुलिंबाची फुलं, रक्तही होईल साफ; आयुर्वेद Dr. ने सांगितली पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 10:01 IST

​Neem Flower Benefits: जर तुम्हाला कोणतंही नुकसान किंवा साइड इफेक्ट न होता या समस्या सोडवायच्या असतील तर कडूलिंबाची फुलं आणि कडूलिंबाच्या ताज्या पानांचा वापर करू शकता.

​Neem Flower Benefits: उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आणि आता त्वचा आणि पचनसंबंधी समस्यांचा धोका वाढतो. या दिवसांमध्ये हायपर अ‍ॅसिडिटी, शरीरात जळजळ, त्वचेवर चट्टे, पुरळ, हीट स्ट्रोक सारख्या समस्या होतात. पोट आणि त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी अनेक औषधं आहेत. पण ही औषधं महाग असतात, सोबतच त्यांचे साइड इफेक्टही खूप असतात.

आयुर्वेद डॉक्टर मिहिर खत्री यांनी सांगितलं की, पित्त असलेल्या लोकांमध्ये ही समस्या जास्त बघायला मिळते. जर तुम्हाला कोणतंही नुकसान किंवा साइड इफेक्ट न होता या समस्या सोडवायच्या असतील तर कडूलिंबाची फुलं आणि कडूलिंबाच्या ताज्या पानांचा वापर करू शकता. महत्वाची बाब म्हणजे या उपचारासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही.

खाजेपासून मिळेल सुटका

उन्हाळ्यात खाज येण्याची समस्या वाढते, अशात हा उपाय ही समस्या दूर करण्यासाठी बेस्ट आहे. कडूलिंबाच्या फुलांमध्ये आणि पानांमध्ये अ‍ॅंटीसेप्टिक, अ‍ॅंटीमायक्रोबियल, अ‍ॅंटी-इचिंग, हीलिंग, कूलिंग गुण असतात. ज्यामुळे हे फायदेशीर आहे.

पोटातील कीडे आणि अॅसिडचा नाश

उन्हाळ्यात पोत आणि आतड्यांसंबंधी समस्याही वाढतात. खासकरून पोटात जंतू आणि अ‍ॅसिड तयार होण्याची समस्या जास्त बघायला मिळते. कडूलिंबाच्या फुलाच्या आणि पानांच्या कडवट टेस्टमुळे या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

रक्त होतं साफ आणि लिव्हर होतं मजबूत

डॉक्टरांनी सांगितलं की, या फूलं आणि पानांमध्ये रक्त साफ करणे आणि लिव्हरच्या कार्याला मदत करण्याची क्षमता असते. रक्त साफ करून त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी याचा वापर करू शकता.

मलेरिया-तापात बेस्ट उपाय

या दिवसांमध्ये मलेरिया आणि ताप येण्याचा सगळ्यात जास्त धोका असतो. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही कडूलिंबाच्या फुलांचा रस प्यायला पाहिजे. डॉक्टरांनुसार यात ज्वरनाशक गुण असतात.

पोटासाठी फुलांचा असा करा वापर

डॉक्टरांनुसार, या वातावरणात कडुलिबांच्या झाडांना नवीन पाने आणि फुलं येतात. तुम्ही फुलं किंवा पानांचा ताजा रस काढून तो सकाळी रिकाम्या पोटी 5 ते 10 मिली इतका घेऊन शकता. त्यानंतर अर्धा तास काहीच खाऊ नये.

त्वचेसाठी कसा कराल वापर

जर उन्हाळ्यात तुम्हाला त्वचेवर फोड, पुरळ किंवा खाजेची समस्या झाली असेल तर तुम्ही कडुलिंबाच्या पानाची आणि फुलांची पेस्ट तयार करा आणि ती प्रभावित भागावर लावा. याने फायदा होईल. खाज किंवा त्वचेसंबंधी कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी कडुलिबांची पाने पाण्यात उकडून या पाण्याने आंघोळ केली तर फायदा होतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सSummer Specialसमर स्पेशल