शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

मळमळ, पोटदुखी, काविळ होईल बरा; आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितला द्राक्ष्याचा खास उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 14:15 IST

द्राक्ष्याचं हे खास पाणी कसं तयार करायचं आणि त्याने कोणकोणत्या समस्या दूर होतात याची माहिती त्यांनी एका इन्स्टा व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.

द्राक्ष ही सगळ्यांनाच आवडतात. खायल गोड-आबंट लागणारी द्राक्ष लोक आवडीने खातात. द्राक्ष्याचे शरीरालाही अनेक फायदे मिळतात. जे बऱ्याच लोकांना माहीत नसतात. आज आम्ही तुम्हाला द्राक्ष्याचा आरोग्याला कसा आणि काय काय फायदा होतो हे सांगणार आहोत. 

द्राक्ष्याचं एका खास पद्धतीने जर सेवन कराल तर तुमच्या वेगवेगळ्या समस्या लगेच दूर होतील. आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी द्राक्ष्याचा एक खास आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे. द्राक्ष्याचं हे खास पाणी कसं तयार करायचं आणि त्याने कोणकोणत्या समस्या दूर होतात याची माहिती त्यांनी एका इन्स्टा व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.

कसं कराल तयार?

डॉक्टर शिंदे म्हणाले की, "द्राक्ष्याचा हा सार तुम्ही जेवण करताना सेवन करू शकता. ५० ग्रॅम द्राक्ष दोन कप पाण्यात टाकून चांगली कुस्करायची. त्यानंतर गाळून घ्यायची. त्यात दोन चिमुट जिरे पूड, दोन चिमुट काळं मीठ टाकायचं आणि जेवण करताना सेवन करायचं".

काय होतील फायदे?

डॉक्टरांनी सांगितलं की, "द्राक्ष्याच्या या साराने दारूची नशा झटक्यात उतरते, मळमळ, जळजळ वाटणं दूर होतं. तसेच तोडांला जर चव वाटत नसेल, आबंट ढेकर, पोट साफ होत नसेल तर याने या समस्याही दूर होईल. त्यासोबतच काविळ झाली असेल तर काविळ दूर करण्यासही हा सार फायदेशीर ठरतो".

द्राक्ष खाण्याची इतर फायदे

इम्यून सिस्टीम बूस्ट होते

द्राक्ष्यातील व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटमुळे इम्यून सिस्टीम मजबूत करण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुम्हाला अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत मिळते. 

हाडे होतात मजबूत

द्राक्ष्यामध्ये प्रोएंथोस्यानिडींस नावाचं तत्व असतं. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. द्राक्ष्याचा सेवनामुळे हाडांसंबंधी समस्या ऑस्टियोअर्थरायटिसमध्येही आराम मिळतो.

हृदयासाठी फायदेशीर

द्राक्ष्यात असलेले अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि पॉलीफेनोल्स आपल्या हृदयाचं आरोग्य सांभाळण्यास मदत करतात. ज्यामुळे हृदयासंबंधी अनेक समस्यांचा धोका कमी होतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार यातील हायपोलिपिडेमिक गुण कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य