शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेथीच्या भाजीचं नियमित करा सेवन, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितले एकापेक्षा एक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 14:23 IST

Methi leaves Benefits : तुम्हीही अनेकदा मेथीची भाजी खाल्ली असेल, पण याचे फायदे तुम्हाला माहीत नसतील. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Methi leaves Benefits : मेथीची भाजी किंवा मेथीच्या दाण्यांचं सेवन लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मेथीची भाजी तर जास्तीत जास्त लोक नियमितपणे खातात. या भाजीची टेस्ट लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडते. मेथीच्या भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. आयुर्वेदात मेथीचा वापर वेगवेगळी औषधं बनवण्यासाठी केला जातो. मेथीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, आयर्न, फायबर आणि पोटॅशिअम भरपूर असतं. त्यामुळे मेथीची भाजी खाणं अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं. तुम्हीही अनेकदा मेथीची भाजी खाल्ली असेल, पण याचे फायदे तुम्हाला माहीत नसतील. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मेथीच्या भाजीचे काय काय फायदे होतात याचा एक व्हिडीओ आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी इन्स्टावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, "ताप आला असेल, कफ असेल, थकवा येत असेल तर मेथीची भाजी नियमित खावी. या भाजीने या समस्या दूर होण्यास मदत मिळते".

मेथीची भाजी खाण्याचे इतर महत्वाचे फायदे

१) पचनक्रिया

पचन तंत्रामध्ये काही समस्या असणाऱ्या लोकांसाठी मेथीची भाजी ही खूप फायदेशीर ठरते. कारण मेथीच्या भाजीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिटेंड्स आणि फायबर भरपूर असतं. हे दोन्ही तत्व पचनासंबंधी समस्या दूर करण्यास फायदेशीर असतात. तसेच ज्या लोकांना बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन अशा समस्या नेहमी होतात त्यांनी मेथीच्या भाजीचं सेवन नियमितपणे केलं पाहिजे.

२) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

मेथीच्या भाजीच्या सेवनाने केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत मिळते. मेथीमधील पोटॅशिअम, आयर्न आणि नायट्रोजनने केस निरोगी राहतात. तसेच मेथीच्या भाजीने त्वचाही चांगली होते.

३) वजन कमी होतं

बऱ्याच लोकांचं वजन वेगवेगळ्या कारणांनी वाढत असतं. अशा लोकांनी मेथीच्या भाजीचं नियमित सेवन करावं. त्यांना वजन कंट्रोल करण्यास मदत मिळेल. कारण यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. जे अन्न पचन होण्यास मदत करतं. तसेच या भाजीमध्ये कॅलरी कमी असतात. ही भाजी खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. या भाजीमधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स मेटाबॉलिज्म बूस्ट करतात. ज्यामुळे फॅट बर्नची क्रिया वेगाने होते. तसेच यातील डायटरी फायबरमुळे लठ्ठपणा कमी करण्यास मदत मिळते.

४) डायबिटीस

डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायबरचं प्रमाण भरपूर असलेली मेथीची भाजी खूप फायदेशीर ठरते. मेथीच्या भाजीमध्ये अमिनो अ‍ॅसिड असतं जे शरीरात ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतं. डायबिटीसमध्ये मेथीच्या भाजीचा ज्यूसही फायदेशीर ठरू शकतो.

५) इम्यूनिटी

मेथीच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. मेथीच्या भाजीचं नियमित सेवन केल्याने इम्यूनिटी बूस्ट होते आणि यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन व आजारांपासून बचाव होतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य