शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

आंघोळ करताना 'या' चुका टाळा, अन्यथा गंभीर दुष्परिणामांमुळे पस्तावण्याची वेळ येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:04 IST

आंघोळ करताना आपण योग्य ती काळजी घेतली नाही तर, त्याचे दुष्परिणाम होऊ (Mistakes made while bathing) शकतात.

अंघोळ करताना (bathing) नकळतपणे काही चुका आपल्या हातून केल्या जातात. त्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. यामुळं तुमच्या त्वचेलाच नाही तर, केसांनाही मोठं नुकसान होऊ शकतं. साबण आणि शाम्पूमध्ये रासायनिक पदार्थ असतात. आंघोळ करताना आपण योग्य ती काळजी घेतली नाही तर, त्याचे दुष्परिणाम होऊ (Mistakes made while bathing) शकतात.

आज तकने दिलेल्या बातमीनुसार, मेडिसिन डायरेक्टचे सुपरिटेंडेंट फार्मासिस्ट हुसेन अब्देह यांनी यापैकी काही चुकांचा अभ्यास केला आहे. बहुतेक साबण किंवा शाम्पू बराच वेळ लावल्यानंतर त्वचा कोरडी होऊ लागते, असं त्यांचं म्हणणं आहे. साबण किंवा शाम्पू वापरल्यानंतर पाण्यानं शरीर आणि केस व्यवस्थित धुणं महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमची त्वचा कोरडी होऊ शकते, त्वचेला तडे जाऊ शकतात.

याशिवाय, तज्ज्ञांनी शॉवरखाली बराच वेळ उभं न राहण्याविषयी सांगितलं आहे. ते म्हणाले की, बराच वेळ आंघोळ केल्यानंतरही त्वचा कोरडी होते. याशिवाय, त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो आणि ती संवेदनशील होऊ शकते. तज्ज्ञांनी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ शॉवर घेणं अयोग्य मानलं आहे.

हार्वर्ड हेल्थच्या म्हणण्यानुसार, शाम्पू, कंडिशनर आणि साबणांमध्ये असलेलं तेल, परफ्यूम आणि इतर घटकांचेही तोटे आहेत. हे सर्व पदार्थ अ‌ॅलर्जीही निर्माण करू शकतात. वेळच्या वेळी अंघोळ करणं आणि अंघोळीचा कालावधी असे दोन्ही महत्त्वाचे आहेत, असं आरोग्य संस्थेनं सूचित केलंय. तथापि, दोन अंघोळींदरम्यान किती कालावधी असावा, याचा आदर्श त्यांनी सेट केलेला नाही.

तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ अंघोळ केल्यानं त्वचेला तडे जाऊ शकतात; ज्यामुळं, बॅक्टेरिया किंवा अ‌ॅलर्जी निर्माण करणारे घटक त्वचेत सहज प्रवेश करू शकतात. अँटीबॅक्टेरियल साबण त्वचेवर असलेले आणि आपल्याला आवश्यक असलेले सामान्य जीवाणू देखील नष्ट करतो. यामुळं त्वचेवरील सूक्ष्मजंतूंचं संतुलन बिघडतं. यामुळं प्रतिजैविकांना (अँटीबायोटिक्स) रोखून अधिक ताकद असलेल्या सूक्ष्मजंतूंना त्वचेवर वाढू लागण्यास अनुकूलता मिळते. यामुळं आपल्याला आजारांना सामोरं जावं लागतं.

याव्यतिरिक्त, आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीला सामान्य सूक्ष्मजीव, अस्वच्छता आणि इतर पर्यावरणीय प्रदर्शनांद्वारे संरक्षणात्मक प्रतिपिंड आणि रोगप्रतिकारक स्मरणशक्तीसाठी विशिष्ट प्रमाणात उत्तेजनाची आवश्यकता असते. याशिवाय, ज्या पाण्यानं आपण आपलं शरीर स्वच्छ करतो त्यात क्षार, जड धातू, क्लोरीन, फ्लोराईड, कीटकनाशके आणि सर्व प्रकारची रसायने असतात. पाण्यात असलेले हे घटकदेखील समस्या निर्माण करू शकतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स