शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

फक्त फायदाच नाहीतर नुकसानदायी ठरतात तांब्याची भांडी; जरा जपून अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 11:17 IST

आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक टिप्स आणि ट्रिक्स आपण अनेकदा वाचतो. खरं तर, जेवढ्या समस्या तेवढेच त्यांच्यावरील उपाय. त्यांपैकीच एक आहे, तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण तयार करण्याचे फायदे.

आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक टिप्स आणि ट्रिक्स आपण अनेकदा वाचतो. खरं तर, जेवढ्या समस्या तेवढेच त्यांच्यावरील उपाय. त्यांपैकीच एक आहे, तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण तयार करण्याचे फायदे. एवढचं नाहीतर अनेक लोक तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. अनेकदा आपण ऐकतो की, तांबं किंवा तांब्याची भांड्यांमध्ये जेवणं किंवा पाणी पिणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. तांबं म्हणजेच कॉपर शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे तुम्हाला फिट अन् फाइन होण्यास मदत होते. 

तांब्यांच्या भांड्यांमध्ये जेवण करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. तसेच काही असे पदार्थ आहेत. जे तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवणं किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून त्यांचं सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. जसं की, दूध, दही आणि लोणची यांसारखे पदार्थ तांब्याच्या भांड्यांमध्ये ठेवल्याने आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. 

लोणची 

तांब्याच्या भांड्यामध्ये लोणची ठेवल्याने कॉपरच्या संपर्कात येऊन पॉयझनिंग इफेक्ट तयार होतात. याच्या सेवनाने तुम्हाला फूड पॉयझनिंग, पोटात जळजळ, अ‍ॅसिडीटी आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं लोणचं जास्त दिवस टिकतंही नाही. 

दही

दह्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक गुड बॅक्टेरिया अस्तित्त्वात असतात. ज्यामुळे तांब्याच्या भांड्यामध्ये हे ठेवल्याने यामध्ये केमिकल रिअॅक्शन होऊन त्याचे उलटे परिणाम दिसून येतात. दूध किंवा दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले दही खाल्याने उलटी, डायरिया आणि पोटासंबंधातील आजारांचा सामना करावा लागतो. 

लिंबाचा रस 

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. पण जर यामध्ये लिंबू सरबत किंवा लिंबाचा वापर करून तयार केला जाणारा कोणताही पदार्थ खाण्याचा विचार करत असाल तर असं अजिबात करू नका. कारण असं करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरतं. लिंबाच्या रसामध्ये असणारं अ‍ॅसिड तांब्यासोबत एकत्र येतं आणि केमिकल रिअ‍ॅक्शन होते. त्यामुळे त्यातील पदार्थांमध्ये बदल घडून येतात. परिणामी त्या पदार्थाचं सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरतं. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही दावा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला देणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स