शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

कधीही आणि कुठेही येईल लघवी, किडनी-ब्लॅडर खराब करतात 'हे' ५ ड्रिंक्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:15 IST

यूरोलॉजिस्ट डॉक्टर जस्टिन हाऊमन यांनी 'डेल मेल'ला ५ अशा ड्रिंक्सची नावं सांगितली, जे पिऊन तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवी येते.

सामान्यपणे डायबिटीसच्या रूग्णांना जास्त लघवी येते. पण काही ड्रिंक्समुळेही तुम्हाला जास्त लघवी येण्याची समस्या होऊ शकते. ज्यामुळे हळूहळू किडनी आणि ब्लॅडरचं काम प्रभावित होतं. पुढे जाऊन जास्त लघवी येण्याच्या समस्येमुळे हे अवयव निकामी होऊ शकतात. इनकॉन्टिनेंस, अर्जेन्सी, रेस्टलेस स्लीप आणि पेल्विक फ्लोर डिस्फंक्शनची समस्या होऊ शकते. याच कारणानं तुम्हाला कधीही कुठेही लघवी येऊ शकते.

यूरोलॉजिस्ट डॉक्टर जस्टिन हाऊमन यांनी 'डेल मेल'ला ५ अशा ड्रिंक्सची नावं सांगितली, जे पिऊन तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवी येते. त्यांनी सांगितलं की, कशाप्रकारे हे ड्रिंक्स यूरिनरी ब्लॅडर आणि किडनीचं नुकसान करतात. यात काही अशाही ड्रिंक्सचं नाव आहे जे हेल्दी मानले जातात. 

दिवसातून किती वेळ लघवी करणं सामान्य?

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इंफॉर्मेशनवर प्रकाशित एका रिसर्चनुसार, दिवसभरात २ ते १० वेळा लघवी येणं सामान्य बाब आहे. त्यापेक्षा जास्त वेळा लघवीला जावं लागत असेल तर हा समस्येचा संकेत असू शकतो. त्याशिवाय तुमचं वय, लिंग, शारीरिक हालचाल आणि वातावरण याचाही विचार करावा लागेल.

वाईन आणि बिअर

डॉ. जस्टिन यांच्यानुसार, अल्कोहोलिक ड्रिंक जास्त लघवी येण्याचं एक मुख्य कारण आहेत. वाईनला हेल्दी मानलं जातं, पण यानंही नुकसान होतं. अल्कोहोल लघवीला कंट्रोल करणारं एंटीड्यूरेटिक हॉर्मोनला ब्लॉक करतं. यामुळे किडनीला पुन्हा पाणी शोषूण घेण्याचा संकेत मिळत नाही आणि अशात जास्त लघवी येते. यानं ब्लॅडर आतून खराब होतं.

एनर्जी ड्रिंक

थकवा दूर करण्यासाठी बरेच लोक एनर्जी ड्र्रिंक पितात. पण हे ड्रिंक्सही नुकसानकारक ठरतात. या ड्रिंक्समध्ये कॅफीन आणि दुआरानासारखे स्टिम्युलेंट असतात. हे ड्यूरेटिक असतात आणि यूरिनचं उत्पादन वाढवतात. एक्सपर्टनुसार, यामुळे ब्लॅडर खराब होतं. काही एनर्जी ड्रिंक्समध्ये टोराइन असतं, जे एडीएच हार्मोन अल्कोहोलसारखं ब्लॉक करतं.

चहा-कॉफी

जास्त लघवी येण्याला जबाबदार ड्रिंक्सच्या यादीत चहा आणि कॉफीचाही समावेश आहे. यातही कॅफीन असतं आणि शुगरचं प्रमाणही वाढतं. एका रिसर्चनुसार, दररोज ३०० मिलीग्रॅम कॅफीन किंवा तीन कप कॉफी, सहा कप चहा घेणाऱ्या लोकांना ओव्हरअ‍ॅक्टिव ब्लॅडरची समस्या होऊ शकते.

कार्बोनेटेड ड्रिंक

नुकसानकारक ड्रिंक्सच्या यादीत चौथ्या क्रमांकावर कार्बोनेटेड फिजी ड्रिंक आहे. यातील अ‍ॅसिड ब्लॅडर लायनिंग खराब करतं. ज्यामुळे ब्लॅडर लघवीला कंट्रोल करू शकत नाही. यात कॅफीन आणि इतरही काही तत्व असतात. सोबतच आर्टिफिशियल शुगर प्रभाव वाढवते.

अ‍ॅसिडिक फ्रूट ज्यूस

लिंबू, संत्री, अननस, मोसंबीसारख्या फळांमध्ये अ‍ॅसिड तत्व असतात. हे जास्त प्यायल्यानं ब्लॅडर आणि किडनीचं काम बिघडू शकतं. या ड्रिंक्सचा प्रभाव इतर ड्रिंक्सच्या तुलनेत कमी होतो. कमी प्रमाणात प्याल तर या ड्रिंक्सनं नुकसान होणार नाही. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स