जगभरात वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट फॉलो केल्या जातात. जसे की, प्रोटीन डाएट, लो कार्ब डाएट आणि ग्लूटेन डाएट इत्यादी. पण गेल्या काही वर्षात आणखी एक डाएट चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. ती म्हणजे कीटो डाएट. आलिया भट, हुमा कुरेशी, सोनम कपूर आणि झरीन खान ही डाएट फॉलो करतात. कीटो डाएटला केटोजेनिक डाएट असंही म्हटलं जातं.
असे सांगितले जाते की, ही डाएट फॉलो करणे फार कठीण असतं. पण जे लोक ओव्हरवेट आहेत, त्यांच्यासाठी ही डाएट कोणत्याही औषधीपेक्षा कमी नाही. कीटो डाएटमध्ये अशा भाज्या किंवा पदार्थ खाल्ले जातात, ज्यांमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असतं. मात्र पोषक तत्त्वांचं प्रमाण अधिक असतं.
या डाएटमध्ये तसे तर फ्लॉवर, कोबी, दही, बटर, नट्स, सीफूड, मांस आणि अंडी यासारख्या गोष्टी खाल्ल्या जातात. पण अॅव्होकॅडो डाएट वजन कमी करण्यात या गोष्टींपेक्षा अधिक फायदेशीर ठरते.
वजन कमी करण्यात अॅव्होकॅडोचे फायदे
- अॅव्होकॅडोमध्ये फॅटचं अधिक प्रमाण असतं. तरी सुद्धा हे फळ वजन कमी करण्यात एकदम परफेक्ट आहे. याचं कारण अॅव्होकॅडोमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. जे पचनाला फार जास्त वेळ घेतो. यामुळे पोट भरलेलं राहतं आणि लवकर भूक लागत नाही. आणि जेव्हा भूक लागत नाही तेव्हा तुम्ही कमी खाता.
- त्यासोबतच अॅव्होकॅडोमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाणही कमी असतं. अॅव्होकॅडोमध्ये काही असे तत्त्व असतात जे केवळ शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यासच मदत करत नाही तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी करतात आणि पचनक्रियाही सुधारतात.
- अॅव्होकॅडोमध्ये ओलिक अॅसिड (oleic acid) नावाचा अनसॅच्युरेडेट फॅट असतो. हे फॅट वजन कमी करण्यास फायदेशीर आहे. कारण हा एक हेल्दी फॅट आहे आणि या फॅटमुळे पोट जास्त वेळासाठी भरलेलं राहतं. त्यामुळे भूक लवकर लागत नाही.
अॅव्होकॅडो खाण्याची पद्धत
तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अॅव्होकॅडो हे फळ तुम्ही आहारात सामिल करा. हे फळ तुम्ही सलाद म्हणून खाऊ शकता. तसेच याचा ज्यूसही तुम्ही सेवन करू शकता. अॅव्होकॅडोचा ज्यूस तयार करण्यासाठी अॅव्होकॅडोमध्ये एक ऑरेंज ज्यूस मिळवा आणि थोडं मीठ घाला. त्यासोबतच तुम्ही अॅव्होकॅडोची भाजी करूनही खाऊ शकता.
(टिप : काही लोकांना अॅव्होकॅडोची अॅलर्जी असू शकते. त्यामुळे हे फळ खाण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.)