मधमाशांच्या हल्ल्यात वृद्धा गंभीर जखमी चिंचोली येथील घटना : जिल्हा रुग्णालयात उपचार

By Admin | Updated: March 15, 2016 00:34 IST2016-03-15T00:34:26+5:302016-03-15T00:34:26+5:30

फोटो आहे....

In the attack of bees, severely injured incident in Chincholi: treatment of district hospital | मधमाशांच्या हल्ल्यात वृद्धा गंभीर जखमी चिंचोली येथील घटना : जिल्हा रुग्णालयात उपचार

मधमाशांच्या हल्ल्यात वृद्धा गंभीर जखमी चिंचोली येथील घटना : जिल्हा रुग्णालयात उपचार

टो आहे....
जळगाव : शेतात काम करीत असताना इंदूबाई आसमान साळुंखे (६५) या वृद्धेवर मधमाशांनी हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना १४ मार्च रोजी सकाळी चिंचोली, ता. यावल येथे घडली. जखमी वृद्धेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इंदूबाई साळुंखे या नेहमी प्रमाणे सोमवारी सकाळी शेतात कामासाठी गेल्या होत्या. तेथे काम करीत असताना अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केल्या. संपूर्ण पोळचे पोळ त्यांच्या अंगावर आल्याने त्या घाबरुन गेल्या व यातून कशी सुटका करावी हे त्यांना सुचेनासे झाले. त्यावेळी आजूबाजूला काम करणार्‍या महिला व पुरुषांनी धाव घेऊन त्यांना तत्काळ घरी आणले. घरी मधमाशांचे काटे काढण्यात आले. मात्र हल्ला एवढा जोरदार होता की, इंदूबाईंना जुलाब-उलट्या सुरू झाल्या व त्या जिल्हा रुग्णालयात दुपारपर्यंत सुरूच होत्या.
चिंचोली येथून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: In the attack of bees, severely injured incident in Chincholi: treatment of district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.