शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन: ई-सिगारेट आणि ई-हुक्का शरीराला हानिकारकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 04:44 IST

विद्युत उपकरणाच्या साहाय्याने द्रवरूप निकोटीन, फळांची किंवा अन्य स्वादांची केलेली वाफ तोंडावाटे घेणे/सोडणे याला ई-धूम्रपान म्हणतात.

डॉ. अजित मगदूम । संचालक, अन्वय फाउंडेशन३१ मे हा जागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन म्हणजे कर्करोगास आमंत्रण हे सत्य आता जगजाहीर आहे. कॅन्सरची लागण होण्यास जे घटक कारणीभूत ठरतात ते तंबाखूत असल्याचे वैद्यकीय विज्ञान सांगते. यासंदर्भात नुकतेच एक सुन्न करणारे वास्तव समोर आले आहे. ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ या स्वयंसेवी संस्थेने मुंबईतील रिक्षाचालकांची कर्करोग चाचणी घेतली. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील तीन हजार रिक्षाचालकांपैकी तब्बल ४५ टक्के म्हणजे तीन हजारांतील १३५0 रिक्षाचालकांमध्ये कर्करोगाची लागण होण्याची लक्षणे असल्याचे या तपासणीत निष्पन्न झाले आहे. रिक्षाचालक या एका उपेक्षित समाजघटकाची ही हादरवून टाकणारी वास्तव स्थिती.

असे इतर अनेक कष्टकरी समाजघटक यांचीही स्थिती यापेक्षा फार काही वेगळी असेल असे नाही. पण देशाचे भवितव्य घडवणारी किशोरवयीन व तरुण पिढी यांच्या विश्वातही चिंता करण्यासारखे खूप काही आहे, असे त्यांच्या वाढत्या व्यसनाधीनतेकडे पाहून निश्चितपणे वाटते. अलीकडच्या काळात तर तरुणांच्या दबक्या आवाजातील संवादातील विषय म्हणजे ई-सिगारेट आणि ई-हुक्का. याबरोबरच हुक्का पेन्स, ई-शिशा, टँक्स, व्हेप्स या साऱ्या बाबींचा समावेश ई-धूम्रपानामध्ये करता येईल.

विद्युत उपकरणाच्या साहाय्याने द्रवरूप निकोटीन, फळांची किंवा अन्य स्वादांची केलेली वाफ तोंडावाटे घेणे/सोडणे याला ई-धूम्रपान म्हणतात. याला इंग्रजीत इलेक्ट्रिक निकोटीन डिलिव्हरी सिस्टम असे संबोधले जाते. ई-सिगारेट, ई-हुक्का यात बॅटरीच्या साहाय्याने द्रवरूप निकोटीनची वाफ करून तोंडात ओढली जाते. तंबाखूने भरलेल्या सिगारेट ओढण्याला जसा स्मोकिंग हा इंग्रजी शब्द प्रचलित झाला आहे तसा या वाफेच्या तोंडात ओढण्याला ‘व्हेपिंग’ हा नवा इंग्रजी शब्द युवावर्गाच्या ओठावर रूळताना दिसतो. चिनी औषधनिर्माता हॉन लिक याने हे नवे उपकरण २000 सालाच्या दरम्यान बनवले. ई-सिगारेट २00३ मध्ये बाजारात आले. सुरुवातीच्या चिनी बनावटीच्या ई-सिगारेटची ऑनलाइन विक्री व्हायची. नंतरच्या दशकभरात त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. अमेरिका, युरोपातील अनेक देशांत ई-सिगारेटची लोकप्रियता जशी वेगाने वाढत गेली तशी

भारतातल्या तरुणांना ई-सिगारेटची भुरळ पडली नाही तरच नवल!कंपन्यांच्या मते ई-सिगारेटमध्ये तंबाखूतील इतर घातक द्रव्ये नसल्याने सुरक्षित असल्याचा दावा केला गेला. निकोटीनचा समावेश नसलेली इतर स्वाद वापरलेली ई-सिगारेट, ई-हुक्का उपलब्ध करून सिगारेटच्या वाटेला न गेलेल्या किशोरवयीनांना आकर्षित करून ई-सिगारेटच्या जाळ्यात ओढले गेले. अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनास एका ई-सिगारेट ‘निकोटीन फ्री’ लिहिलेल्या ई-सिगारेट नमुन्यात निकोटीन आढळले.

जॉन हाफकिन्स सिकॅरॉन सेंटर फॉर प्रिव्हेन्शन ऑफ हार्ट डिसीजचे संचालक मायकेल ब्लाहा म्हणतात, ‘ई-सिगारेटमध्ये निकोटीनची मात्रा तीव्र स्वरूपात असल्याने त्याचे हेरॉईन किंवा कोकेनइतके जालीम व्यसन लागू शकते. त्यामुळेच आज जे कधीही धूम्रपान न करणारे हजारो तरुण व्हेपिंगची चटक लागल्याने व्यसनाधीन होत आहेत. यामध्ये नेहमीच्या तंबाखू भरलेल्या सिगारेटपेक्षा जास्त निकोटीन असल्याने, त्याचे दुष्परिणाम लगेचच दिसतात. ई-सिगारेटमध्ये जादा शक्तीचं काट्रीज किंवा अधिक जोरात किक येण्यासाठी जादा होल्टेज वापरण्याच्या सुविधा धोकादायकच आहेत.

सर्वसाधारणपणे सांगितला जाणारा दुष्परिणाम म्हणजे कोरडा खोकला येणे, घश्यात व तोंडात खवखवण्याचा त्रास होणे इ. अभ्यासातून व पाहणीतून फुप्फुसाला इजा करणारे घटक त्यामध्ये असल्याचे आढळून आले आहे. जास्त तीव्रतेची निकोटीन मात्रा किंवा अधिक होल्टेज वापरण्याने रक्तदाब वाढणे तसेच श्वसननलिका, फुप्फुसे व तोंडाचे विकार जडण्याची शक्यता वर्तविली जाते. ई- सिगारेट हृदयरोगाच्या रुग्णांसाठी कमी धोकादायक असते, असे पसरवले जाते. मात्र याला चुकीचे ठरवण्याचे संशोधन समोर आले आहे. तसेच ई-सिगारेटपासून सुरुवात करणाऱ्यांना नंतर तंबाखूयुक्त सिगारेटचे व्यसन लागते असेही दिसून आले आहे. निकोटीनमुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेवर प्रभाव पडतो. त्यामुळे ते उत्तेजित होतात. हृदयाचे ठोके वाढणे, उच्च रक्तदाब, रक्तवाहिन्यांवर परिणाम यामुळे अशा व्यक्तीचे आयुर्मान कमी होते. ई-हुक्काही शरीराला अपायकारक आहे. एकंदर ई-सिगारेट, ई-हुक्का यापासून तरुणांनो सावध राहा.

टॅग्स :Healthआरोग्य